● लॉकडाऊन च्या संकट काळात ऑटो चालकांना दिला मदतीचा हात…
चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
दि. १३ मे रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्यातर्फे लॉकडाऊन च्या गंभीर परिस्थितीमध्ये ऑटोचालकांचे रोजगार बंद असल्याने त्यांच्या समोर संकट उभे असतांना त्यांना मदतीचा हात देत 17 ऑटोचालकांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.
गत वर्षभरापासून कोरोना महामारी सारखे संकट समस्त जगासमोर उभे ठाकले आहे. या मोठ्या संकटाशी मनुष्य रोजच संघर्ष करतोय या महामारिने राजा आणि रंक, सर्वांनाच एका रांगेत बसविले आहे. या महामारीच्या संकटामुळे पुन्हा एकदा लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. आणि परत पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे.
रोज-मजुरी करून आपलं संसाराचा गाढा ओढणारी गोर-गरीब जनता या संकटापुढे हतबल झाली आहे. लॉकडाऊन असल्याने रस्तेवाहतुक सुद्धा अल्पप्रमाणात आहे त्यात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू असून, खाजगी वाहतुकीची साधने सुद्धा सरकारच्या निर्देशानुसार बंद आहेत. त्यातच ऑटो वाहतूक बंद असल्याने ऑटोचालकांचा सुद्धा रोजगार बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी परिसरातील ग्रामीण भागात ऑटोचालक ऑटो चालवून आपली उपजीविका करत असतात. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून ते अत्यंत अडचणीत आहेत अशी माहिती मिळाली, शासन मदतीस धावून येण्यास विलंब होत असताना त्यांची तात्काळ दखल घेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्यातर्फे लगेच भिसी येथील गरजू ऑटोचालकांना किराणा किट चे वितरण करण्यात आले.
यावेळी, भाजपा युवा नेते मा. प्रदीप
कामडी सदस्य पं. स चिमूर, विनोद खवसे शहराध्यक्ष भाजयुमो भिसी, राजू बानकर शक्ती केंद्र प्रमुख भाजपा भिसी आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते
Add Comment