Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी

जनता करीअर लॉंचरचा १००% निकाल, इतिहासाची पुनरावृती कायम

janata career launcher
– बारावी विज्ञान शाखेतील निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम
– विज्ञान शाखेचा निकाल १००%
– सर्वात जास्त विद्यार्थी प्राविण्य प्राप्त व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

चंद्रपूर (प्रतिनीधी) :

हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणी उच्च माध्यमिक मंडळाने शासन निर्णयानुसार बारावीचा सत्र २०२०-२१ चा निकाल आज (दि.३) ला जाहिर केला. यानुसार याहीवर्षी जनता करीअर लॉंचरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम ठेवली आहे. जनता करीअर लॉंचरचा निकाल १००% इतका लागलेला आहे.जनता करीअर लॉंचरमधून विज्ञान शाखेची कु. सिध्दी राजेश तडसे (९६%), कु. अंजली अनिल निकोडे (९५.६६%), कु. समृध्दी खेडीकर (९४.८३%), कु. अंकिता दुर्गे (९४.३३%), कु. अंजली बनसोड (९३.६६%), राहुल वर्टी (९३.५०%), सुरेश खाडे (९३.०५%), कु. प्रणौती तळोधिकर (९२.६६%), कु. वसूधा वराटे (९२%), अनिस वाघाडे (९२%), कु. सन्युक्ता बावणे (९१.६६%), युगम कूकडे (९६.६६%), कु. पुजा वडस्कर (९१.५०%), कु. मृदुला पांगुल (९१.०३%), अजय संखारी (९१%) गुण प्राप्त करुन प्राविण्य प्राप्त झालेले आहेत. ४७ विद्यार्थ्यांनी ९०% हून जास्त गुण घेवुन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तर ८०% हून अधिक गुण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येत आहे.जनता करीअर लॉंचरच्या निकालाने आकृष्ठ होवून चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, नागपुर या जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेशित होतात. व सर्वच पालक तथा विद्यार्थी लॉंचरला प्रथम पसंती देतात. संस्थेच्या या शाखेच्या माध्यमातून आजतागायत अनेक विद्यार्थी इंजिनीअरींग व मेडीकल कोर्सेस करीता प्रवेशित झालेले आहे.प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, उपप्राचार्य प्रा.सौ. के.ए. रंगारी, जनता करीअर लॉंचरचे प्रा. लिलाधर खंगार, प्रा. नितिन कुकडे, प्रा. प्रेमा झोटींग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!