कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

गत 24 तासात 354 कोरोनामुक्त 974 पॉझिटिव्ह ; 10 मृत्यू

354 corona free in last 24 hours 974 positive; 10 deaths

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 974 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 10 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 34 हजार 503 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 113 झाली आहे. सध्या 5888 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 4 हजार 498 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 65 हजार 135 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये आंबेनेरी ता. चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष, सोनेगाव बु. ता. चिमूर येथील 65 वर्षीय महिला, पिपर्डा ता. चिमूर येथील 50 वर्षीय महिला, चंद्रपूर शहराच्या सरकारनगर येथील 38 वर्षीय महिला, भिवापूर बंगाली कॉलनी येथील 58 वर्षीय महिला व जटपुरा गेट येथील 62 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुमाऊली नगर वरोरा येथील 70 वर्षीय महिला, सलीमनगर, वरोरा येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारशा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 502 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 458, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची रुग्णसंख्या
ठिकाण रुग्ण संख्या
चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 309
चंद्रपूर तालुका 58
बल्लारपूर 10
भद्रावती 108
ब्रम्हपुरी 16
नागभिड 26
सिंदेवाही 06
मूल 21
सावली 14
गोंडपिपरी 10
राजूरा 15
चिमूर 142
वरोरा 205
कोरपना 26
इतर ठिकाणच्या 08
एकूण 974


नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!