चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत मोहफुल भट्टीवर धाड आरोपींवर गुन्हा दाखल.

A case has been registered against the accused for raiding Mohful Bhatti under Chimur police station.

एपीआय मंगेश मोहोड यांनी केली कारवाई .

सुरज नरुले
(चिमूर तालुका प्रतिनिधी )

चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात देशी विदेशी मोहफुल दारू मोठ्या प्रमाणावर वाढली असताना कोरूना काळात जनतेची सुरक्षा करीत असताना एपीआय मंगेश मोहोळ यांना मुखबीर च्या गुप्त माहितीवरून त्यांनी आपल्‍या सहकार्यास माणूस मारी जंगलात जाऊन धाड टाकून त्या मोहफुल दारू विक्रेत्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला असल्याने दारू विक्रेत्यात खळबळ माजली आहे.



चिमूर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात आज 27 एप्रिल ला पेट्रोलिंग करत असताना मुखबीर कडून खात्रीशीर माहिती मिळाली असता नामे सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर दोन्ही रा. कवडशी असे मिळून माणूस मारी जंगल परिसरात लपत लपत जाऊन मोह फुल दारू भट्टी कडे गेले असता सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर हे पोलिसांची चाहूल लागताच जंगलाचे दिशेने पळून गेले . सदर ठिकाणची पाहणी केली असता घटनास्थळावर 160 लिटर किंमत 96,000 रुपये मोह सडवा किंमत 1,O4000 मोहा दारू काढण्याकरिता लोखंडी शेगड्या, लोखंडी आणि प्लास्टिक ड्रम, लोखंडी पिपे इत्यादी साहित्य किंमत 24300 असा एकूण 224000 रुपये मुद्देमाल मिळून आला .



यातील आरोपी सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर सर्व राहणार कवडशी याच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही पोलीस अधीक्षक साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी बगाटे, मोनी रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात एपीआय मंगेश मोहोड , पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, प्रवीण गोन्नाडे करीत आहे .



चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत मोहभट्टी वरून दारू पकडली असली तरी भर वस्तीत दारू अड्डे उध्वस्त करावे जेणेकरून आसपासच्या जनतेला त्रास होणार नाही कोरोना संसर्ग वाढणार नाही अशी दखल चिमूर पोलिस स्टेशन ठाणेदार यांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!