महाराष्ट्र सामाजीक

मध्यमवर्गीय व नौकरदारांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: डॉ. अशोक जिवतोडे

पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून कर रचनेत कोणताही बदल न केल्यामुळे मध्यमवर्गीयांची व नौकरदारांची घोर निराशा झाली आहे. तसेच या अर्थसंकल्पातून पाहिजे तसा रोजगार निर्मितीवर भर न दिल्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. अनेक वस्तु स्वस्त व अनेक वस्तु महाग केल्यामुळे केंद्र सरकारने उत्पन्नच वाढविण्याचे या अर्थसंकल्पातून भर दिला आहे. पायाभूत सुविधेसाठी मात्र चांगली तरतूद केली आहे. रस्ते, हवाई वाहतुकीसाठी व ई-व्हेइकल साठी चांगली गुंतवणुक आवश्यक आहे, ती सुध्दा तूटपुंजीच वाटते. अल्प व मध्यम घटकांच्या घरांसाठी चांगली तरतूद केली आहे. तसेच सर्वसामान्य शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न दिसून येतो. हा अर्थसंकल्प दिर्घकालीन दुरदृष्टी व भविष्यकालीन अपेक्षा लक्षात न घेता तात्पुरता असल्याचे दिसून येतो . मध्यमवर्गीय समाजावर भार पडेल तसेच महागाई वाढतीच राहील असेच काहिसे चित्र या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!