महाराष्ट्र सामाजीक

तब्बल एक महिन्यानंतर ती जखमी वाघीण कॅमेरात झाली ट्रॅप…

वरोरा : तालुक्यातील सालोरी लगतच्या जंगलात शिकाऱ्यांचा फास गळ्यात अडकलेली वाघीण एक महिण्यापूर्वी आढळली होती. ती वाघीण २० जून रोजी पहाटे वाघोली-पेवराच्या कक्ष क्रमांक १० मधील कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे म्हटले जाते. दरम्यान तिच्या शोधाकरिता मंगळवार २१ जून रोजी पुन्हा एकदा चंद्रपूर येथून आरआरयु टीम दाखल झाली. परंतु वृत्त लिहीपर्यंत वाघिणीचा शोध लागला नव्हता अशी माहिती आहे.
वरोरा तालुक्यातील सालोरी लगतच्या जंगलात २२ मे रोजी रक्त आढळून आल्यानंतर २३ मे रोजी गळफास लागलेली वाघीण कॅमेऱ्यात कैद झाली होती. यामुळे तिच्या बचावाकरिता २७ मे पासून शोधमोहीम राबविली जात आहे. याकरिता जंगलात आवश्यक त्या संभाव्य ठिकाणी ६५ कॅमेरे लावण्यात आले. परंतु २३ मे नंतर १९ जूनपर्यंत ती वाघीण कोणत्याही कॅमेऱ्यात कैद झाली नव्हती. तसेच शोध मोहिमेतील कोणत्याही सदस्याला ती दिसली नव्हती. यामुळे तिचा मृत्यू तर झाला नसेल ना अशी शंका उपस्थित केली जात होती. याच दरम्यान २० जून रोजी ती वाघीण गळफास लागलेल्या अवस्थेत वाघोली-पेवराच्या कक्ष क्रमांक १० मधील कॅमेऱ्यात पहाटे कैद झाल्याचे बोलले जाते. परिणामी काही दिवसांपूर्वी नैसर्गिकरित्या तिच्या गळ्यातील फास निघाला या वृत्ताला देखील पूर्णविराम लागला आहे. दरम्यान तिची प्रकृती गंभीर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे तिला शोधण्यासाठी आरआरयु टीमला पशु वैद्यकीय अधिकारी आणि शूटर घेऊन २१ जून रोजी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले. या टीमसोबतच मोहिमेतील अन्य सदस्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत त्या वाघिणीचा शोध घेतला. परंतु वृत्तलिहीपर्यंत वाघीण आढळून आली नाही. २० जून रोजीच सकाळी आरआरयु टीमला घेऊन शोध कार्य सुरू केले असते तर चित्र वेगळे असू शकले असते. दरम्यान मंगळवारी रात्री सुद्धा शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. वाघीण लवकरच सापडेल असा विश्वास शोध मोहिमेतील सदस्यांना आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!