महाराष्ट्र सामाजीक

वरोरा तालुक्यातील चारगाव बु येथे भर दिवसा घुसला गोठ्यात वाघ

वरोरा – स्थानिक चारगाव बू येथे आज चक्क भर दुपारी वाघ गावात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. सविस्तर असे की आज दुपारी दोन वाजता पासून मेघ गर्जना सह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर या मेघ गर्जनेत व भर पाण्यामध्ये गावात वाघ आला तर हा वाघ शेत शीवरातून आला असून चारगाव वायगाव रस्त्यावरील श्री मधुकर भलमे यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसला असल्याचे गावकऱ्यांनी पहले असता . आरडा ओरड केली असता हा वाघ उडी घेऊन गोठ्यात शिरला व वरती असलेल्या चार ठेवण्याच्या ठिकाणी तो चडून बसला . तेव्हा वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली असून हा वाघ कधी कुणावर अट्याक करेल याचा काही नेम नाही करिता गावकरी काळजी पूर्वक दर्शन घेत आहे . विशेष म्हणजे याची माहिती वन विभाग कर्मचाऱ्याला दिली असून वृत्त लीहे पर्यंत वण विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले नव्हते .

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!