Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात हळदा येथील युवक जखमी

A youth from Halda was injured in a tiger attack
ब्रह्मपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रातंर्गत जंगलव्याप्त भागात असलेल्या हळदा येथील एका युवकावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दिनांक 18 जुलै रोजी रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हळदा शेतशिवारात घडली आहे.



यामध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत (वय 35) हा युवक जखमी झाला आहे.हळदा परिसरात सध्या वाघाची दहशत असून मागील दोन दिवसांपूर्वी हळदा येथील शेळ्यांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते.प्राप्त माहितीनुसार सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात धानपीक रोवणी सुरू आहे. हळदा येथील ज्ञानेश्वर राऊत हे आपल्या शेतावर गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने ज्ञानेश्वर यांच्या वर हल्ला केला. त्यानंतर सदर युवकाने आरडाओरड केली असता आजुबाजूच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी व शेतमजूर मदतीसाठी धावून आले. तेव्हा वाघ मात्र पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात सदर युवकाच्या मानेला व छातीवर वाघाने जखमा केल्या आहेत.



सदर माहिती वनविभागाला मिळताच घटनास्थळ गाठुन तत्परतेने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर जखमी युवकाला आरमोरी येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असुन युवकावर उपचार सुरू आहे.



सदर परीसरात वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असतात गस्तीवरील कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सोबतच सदर परीसरात ट्रँप कँमेरे लावण्यात येणार आहेत.
व दररोज वनविभागाच्या वतीने रात्रीच्या सुमारास गावासभोवताल फटाके फोडण्यात येतात.
–आशुतोष मेंढे
दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!