पोलीस स्टेशन सिंदेवाही हददीत अल्पवयीन मुलीवर लैगींक अत्याचार करणाऱ्या आरोपीस ०५/०३/२०२१ रोजी मा. श्री. वि.द. केदार, सत्र न्यायाधीश क. १ चंद्रपुर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत मौजा मिनधरी शिवटेकळी जवळ दिनांक २७/१२/२०१९ रोजी यातील आरोपी नामे विनोद रामभाउ चेंबुरवार वय ४४ रा. नवरगाव रत्नापुर, ता.सिंदेवाही, जि. चंद्रपुर याने यातील फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिला फोन करून सांगीतले की, आम्ही मिनधरी शिवटेकळी जवळ डब्बा पार्टी ठेवली आहे. असे सांगीतल्यावर तिथे पिडीत अल्पवयीन मुलगी गेली असता, त्याठिकाणी कोणीही मिळुन आले नाही. पिडीत मुलीला कोणीही मिळुन न आल्याने ती एकटी झाडाखाली थांबली असताना आरोपीने एकटेपणाचा फायदा घेवुन तिथे असलेल्या पळक्या रेस्टहाउसमध्ये नेवुन जबरी संभोग केला, आणि यापुर्वीसुध्दा आरोपीने पिडीत मुलीला आपल्या रूमवर नेवुन जबरी संभोग केला होता. आणि याबाबत कोणालाही सांगीतले तर तुझे नुकसान करील अशी धमकी दिली. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अप.क. ६८७/ २०१९ कलम ३७६ ( ३)३७६(२) (एफ) (एन) (के), ५०६ भादवि, सहकलम ३(१ ) (डब्लु) (आय), ३(२), (व्ही). ३(२), वाय,४,६ पोस्को कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री. मिलींद शिंदे यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक ०५/०३/२०२१ रोजी आरोपी नामे विनोद रामभाउ चेंबुरवार वय ४४ रा. नवरगाव रत्नापुर, ता.सिंदेवाही, जि. चंद्रपुर यास कलम ३७६ (३)३७६ (एफ) (एन) (के) भादवि व ६ पोस्को मध्ये १२ वर्ष शिक्षा, कलम ३७६(२) (एफ) भादंवि मध्ये १० वर्ष, व ५,०००/-रू दंड, कलम ५०६ भादंवि मध्ये २ वर्ष व १००० रू दंड, ३(२) (डब्लु) (ii), ३(२), (व्ही), ३(२), वाय मध्ये जन्मठेपेची शिक्षा, कलम ३(२)(व्ही) अनु. जा.ज. अ. प्र. कारयदा मध्ये २ वर्ष व ३,००० रू. दंड न भरल्यास साडेतीन वर्ष शिक्षा मा. श्री. वि.द. केदार, सत्र न्यायाधीश क. १ चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. संदीप नागापुरे, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन सफौ. रमेश मुक्कावार, पोलीस स्टेशन सिंदेवाही यांनी काम पाहिले.
Add Comment