क्राइम महाराष्ट्र

बलात्कार करणाऱ्या आरोपीस दहा वर्ष कारावासाची शिक्षा आणि दंड

चंद्रपूर – पोलीस स्टेशन बल्लारशा हददीत रेल्वे स्टेशन यार्ड परीसरात बलात्कार करणाऱ्या आरोपीस १५/११/२०२१ रोजी मा. प्रभाकर जयराम मोडक, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोर्ट ३ रे चंद्रपुर यांनी १० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस स्टेशन बल्लारशा अंतर्गत दिनांक ०८/०५/२०१९ रोजी फिर्यादी ही वाजपेयी हॉटेल मध्ये काम करुन एकटी घरी जात असता ती रेल्वे क्वॉर्टरच्या बाजुला लघुशंकेस बसली असता यातील आरोपीने फिर्यादीस धमकावुन हात धरुन रेल्वे पटरी कडे नेवुन जबरदस्तीने जबरी संभोग केला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बल्लारशा येथे अप.क. ४११/२०१९ कलम ३७६(१), ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर सपोनि. धर्मेंद्र जोशी यांनी आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १५/११/२०२१ रोजी आरोपी नामे शंकर बाबुराव यादव वय २८ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन परिसर बल्लारशा यास कलम ३७६(१) भादंवि मध्ये १० वर्ष कारावासाची शिक्षा व २,०००/- रू दंड, दंड न भरल्यास ०६ महीने कारावास व कलम ५०६ भादवी मध्ये १ वर्ष शिक्षा व ५००/- रु दंड, दंड न भरल्यास १ महीना कारावासाची शिक्षा मा. श्री. प्रभाकर जयराम मोडक, अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर कोर्ट ३ रे चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. आसीफ शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. भगवान दा. मेश्राम, पोलीस स्टेशन बल्लारशा यांनी काम पाहिले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!