चंद्रपूर – पो.स्टे. दुर्गापूर येथे फिर्यादी नामे योगेश्वर यशवंतराव दुधपचारे रा. श्रध्दा नगर तुकूम ता. जि. चंद्रपुर यांनी पो.स्टे. दुर्गापूर येथे तोंडी रिपोर्ट दिली की दि. १५/०९/२०२१ रोजी रात्रौ २३:०० वा. फिर्यादीचा मुलगा अवकाश हा घराचे वरच्या मजल्यावरून अभ्यास करून खालचे मजल्यावर झोपण्याकरीता आला. तेंव्हा त्याने लॅपटॉप व ब्लुटुथ स्पिकर वरचे मजल्यावर ठेवला होता. वरचे मजल्यावर कुलुप लावायचे विसरला. व दिनांक २६/९/२०२१ रोजी चे सकाळी १०/०० वा. फिर्यादीचा मुलगा लॅपटॉप पाहायला गेला असता त्याने वरचे मजल्यावर ठेवलेला लॅपटॉप व ब्लुटुथ रिपकर दिसुन न आल्याने कोणीतरी अज्ञात चोराने खुल्या दरवाज्यातुन आत प्रवेश करून सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप कि.अं.२०,०००/- रू.व ब्लुटुथ स्पिकर कि.अं. ५०००/- रू.असा एकुण २५,०००/-रु.चा माल चोरून नेला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. दुर्गापूर ला अप क्र. २३४/२०२१ कलम ३८० भा.द.वि. चा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हया बाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिलवंत नांदेडकर साहेब चंद्रपुर, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे पो.स्टे. दुर्गापूर यांचे नेतृत्वात दुर्गापूर गुन्हे शोध पथकातील पो.उप. नी. प्रविण सोनोने, पो.हवा. सुनिल गौरकार, पो. अं. मंगेश शेंडे पो. अं. मनोहर जाधव पो.स्टे. दुर्गापूर यांनी आरोपी नामे १) सुलेमान सुलतान शेख वय २० २) राहुल राजेश मेश्राम वय २५ वर्ष ३) भुगोल ईतिहास मानकर वय १९ वर्ष सर्व रा. दुर्गापूर वार्ड क्र. ४ यांना अटक करून वरील नमुद चोरी गेलेला मुद्देमाल आरोपीताकडुन १) सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप कि.अं.२०,०००/-रू.२) ब्लुटुथ स्पिकर कि.अं. ५०००/-रू३) गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची डिओ गाडी क्र. एम एच. १४ एच. झेड.८७६४ कि.अं.६०,०००/-रू.४) आरोपीकडुन जप्त केलेले दोन अंड्राईड मोबाईल कि.अं.२०,०००/- रू. असा एकुण १,०५,०००/-रू.चा माल हस्तगत करून गुन्हा काही तासातच उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
Add Comment