पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

बलात्कार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि दंड…

चंद्रपूर – पोलीस स्टेशन माजरी हृददीतील मौजा एकता नगर माजरी पो.स्टे. माजरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस दि. १५/०२/२०२२ रोजी मा. श्री. डी.के.भेंडे साहेब, सत्र न्यायाधीश, न्यासयालय वरोरा यांनी मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा ठोठावली आहे.

पोलीस स्टेशन माजरी घटना ता. वे व ठिकानी यांतील अल्पवयीन पिडीत फिर्यादी ही घरी एकटी असतांना फिर्यादीचे आईच्या दुसन्या पतीने पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. व सदर बाब आईला सांगीतल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे पिडीत अल्पवयीन व फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

निकाल – दिनांक १५/०२/२०२२ रोजी सदर प्रकरणामध्ये नमुद आरोपीस कलम ३७६ (२), (F)) (k) (N), ५०६ भादवी सहकलम ४,६ पोस्को कायदयानुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व ४००० / – रू दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे पो.स्टे. भद्रावती यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहीले. न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १५/०२/२०२२ रोजी आरोपी नामे भागवना इंद्रपाल केवट वय ४५ वर्षे रा. एकता नगर माजरी जिल्हा चंद्रपूर यास सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. एम. एम. देशपांडे, सहा. सरकारी अभियोक्ता, वरोरा आणि कोर्ट पैरवी म्हणुन सफौ / १५२६ साईनाथ पदमाईकर, पोलीस स्टेशन माजरी यांनी काम पाहिले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!