पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

जुगार अड्डयावर धडक कारवाई …

चंद्रपूर –

दुर्गापुर हद्दीतील आंबेडकर चौकातील खानदे यांचे दुकानाचे मागील भागातील उत्तरवार यांचे दुकानाचे चाळीमधील दुकानात सट्टापट्टीवर पैसे लाऊन, जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांना प्राप्त झाली, त्यावरुन सदर ठिकाणी श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांनी स्टाफसह छापा मारला.

यावेळी सट्टीपट्टी चालविणायासह एकुण १८ इसम जुगार खेळतांना मिळुन आले. सदर इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. १८ इसमांच्या अंगझडतीत रोख रक्कम व इतर साहीत्य ३,३४,५२६ /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असा एकुण

सदरची कारवाई मा. श्री. अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर व मा.श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील पोलीस स्टॉप स.फौ. राजेश चुचूलवार, पो. हेड कॉ. किसन राठोड, पोलीस अमंलदार शितल बोरकर, मनोज चालखुरे, पुर्वेश महात्मे, आदेश रामटेके, जगदीश जिवतोडे व अमरदिप आवळे यांचेसह करण्यात आलेली असुन एकुण १८ आरोपींविरुध्द कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे दुर्गापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!