चंद्रपूर – पोलीस स्टेशन हद्दीत सध्या सुरु असलेल्या कोरोणा विषाणु संसर्गजन्य रोगाचे मा. जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपुर यांनी पारीत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार, पोनि राजेश मुळे, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले तसेच सोबत डि.बी. स्टॉफ हे पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, हॉटेल ग्रिन पार्क मुल रोड लोहारा येथे कोवीड-१९ नियमांचे उल्लंघन करुन कोणतीही शासकीय परवानगी न घेता हॉटेल चालकाकडुन पंजाबी समाजाचा लोहरीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त लोक संख्या जमवुन कोविड नियमाचे उल्लघंन करतांना दिसुन येत असल्याबाबतची गोपनिय माहीती मिळाले वरुन हॉटेल ग्रिन पार्क येथे पोलीस अधीकारी व कर्मचारी गेले असता हॉटेल मधील लॉन मध्ये अंदाजे ७० ते ८० लोकांची गर्दी जमवुन सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भावा संबधाने शासनाने पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत असतांना दिसुन आल्याने हॉटेल मालक, कार्यक्रमाचे आयोजक तसेच डि जे. चालक यांचेवर सरतर्फे पोउपनि विनोद भुरले यांचे तकारी वरुन अप कं. २५/२०२२ कलम १८८, २६९, २७०, २७१ भादवी सहकलम ३ साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८, ९, ७ तसेच कलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच कलम ३७ (३), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.
तसेच याव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाने नेमुण दिलेल्या आकास्मीत पथकास पाचारण करुण त्यांचेकडुन हॉटेल ग्रिन पार्कचे मॅनेजर नामे सावन शेखर पोनकटवार यांचेवर ५०,००० /- रुपये तसेच कार्यक्रमाचे आयोजक नामे संदिपसिंग बोपारा यांचेवर १२,००० /- रुपये दंड करण्यात आले आहे.
तरि पोलीस स्टेशन, रामनगर हद्दीत हॉटेल व लॉन चालक तसेच शहरातील इतर नागरीकानी सुध्दा कोरोना विषाणु संसर्गजन्य रोगाचे संबधाने शासनाने पारित केलेल्या आदेशांने उल्लंघन करु नये असे आवाहन करण्यात येत आहे.
Add Comment