Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर मंडल अधिकारी चंद्रपूर ह्यांची कार्यवाही….

चंद्रपूर –

ज बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी रमेश आवरी व त्याच्या तलाठी यांच्या पथकांनी कोयना गेट दुर्गापूर येथे धाड मारली असता अवैध रेती उत्खनन करताना दोन ट्रॅक्टर पकडले.    बरेच वर्षांपासून रेती चोरट्या कडून रेती तस्करी होत आहे अनेकदा धाडी टाकून ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करून लाखो रुपये दंड वसूल केला असला तरी रेती तस्करी ला चाप बसवता आला नाही.    अश्यातच रेती तस्करी होत असल्याने एस डी ओ रोहन घुगे व तहसीलदार निलेश गोंड ह्यांच्या मार्गदरशनाखाली मंडळ अधिकारी रमेश आवरी तलाठी कु.येरमे , व कु. मडावी यांनी धाड टाकली असता एम एच 34 बी आर 5657 व एम एच 34 ए पी 2659 या ट्रॅक्टरला रेती उत्खनन करताना रंगेहात पकडले. त्या ट्रॅक्टरला तलाठी कार्यालयात लावण्यात आले व ट्रॅक्टर मालका कडून दंड वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे.


error: Sorry !! Content is Copyright protected !!