सामाजीक

नेरी सिरपुर मार्गाचे जलदगतीने काम करण्यासाठी प्रहार चालक मालक संघटनेचे आंदोलन

सुनिल कोसे– नेरी (चिमूर)
नेरी सिरपुर मार्गाचे काम हे अतिशय कासवगतीने सुरू असून रस्ता पूर्ण उखळून त्यावर गिट्टी टाकून ठेवल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकरी शाळेची विद्यार्थी पडचालक वाहन चालक याना जाण्यासाठी येण्यासाठी खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक वाहनांची स्लिप होऊन मोडतोड झाली आहे अनेक जण अपघातग्रस्त झाले आहे तर जनावरांना सुद्धा इजा झाली आहे या सर्व बाबी साठी मा राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ संपर्कप्रमुख राजू भाऊ कुबडे रीशी कुंवर नागपूर शेरखान प्रहार सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार चालक मालक संगठना शाखा नेरी च्या वतीने रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तसेच अपंगत्व आलेल्या लोकांना मदत कामावर असलेल्या मजुरांचे थकीत पगार लवकर देण्यासाठी तसेच धुळीने पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी दि 5 मार्चला नेरी सिरपुर रस्त्यावर आंदोलन करण्यात आले
नेरी सिरपुर रस्त्याचे काम मागील 2 ते 3 महिन्यापासून सुरू असून संपूर्ण रस्ता 4 ते 5 की मी उखळून खोदून त्यावर गिट्टी टाकली आहे त्यामुळे वाहतूक करताना खूप मोटा नाहक त्रास होत आहे वास्तविक नियमानुसार एका बाजूने रास्ता खोदून काम पूर्ण करायला पाहिजे होते पण तसे न करता संपूर्ण रस्ता उखळून ठेवला आहे त्यामुळे वाहनाचे टायर फुटणे ब्रेक डाऊन होणे स्लिप होऊन पडणे अश्या अनेक बाबी घडत आहेत त्यामुळे नेरी सिरपुर परिसरातील आणि तळोधी कडे जाणाऱ्या वाहतुकदारांना खूप मोठा मनस्ताप होत आहे यामुळे या झोपलेल्यायाआणि कासवगतीने काम करणाऱ्या स्वास्तिनो आणि आयसीसी कंपनीला जागे करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष प्रेरित प्रहार वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने एक दिवशीय आंदोलन करण्यात आले दि5 मार्चला रस्त्यावर जाऊन कंपनीच्या काम करणाऱ्या मशीन गाड्या ना घेराव घालून ठिय्या आंदोलन केले कंत्राटदार ठेकेदार याना काम जलदगतीने करण्याची मागणी घालत काम पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन घेत आंदोलन मागे घेतले यात वाहनांची नुकसानभरपाई द्यावी धूळ माती पिकांची नुकसान झाली ती भरपाई द्यावी अपघातग्रस्तांना भेटी देऊन त्यांना मोबदला द्यावा रोजनदारी मजुरांचे थकीत पगार लवकर द्यावे त्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी रोज रोडवर दोनदा पाणी मारावे एका साईड ने रस्ता पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा अश्या अनेक मागण्यांचे निवेदन दिले असता कंपनीच्या संचालकांनी 14 तारखेपर्यंत रस्ता पूर्ण करू व वरील सर्व मागण्या मान्य करून सोडविण्यात येथील असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन माघे घेण्यात आले जर 14 तारखे पर्यंत रस्ता आणि इतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येणार असा इशारा संघटने वतीने देण्यात आले या आंदोलनाला प्रवीण वाघे प्रहार सेवक सचिन वाघे ,नंदू निकोडे, संजय दडमल ,हरजित भौड, दर्या वाघमारे ,प्रवीण बोरसरे, मुन्ना बन्सोड, सुमित दंडारे, आशिष कामडी, बजरंग भाऊ, विपीन कामडी ,अनिल चाफले, अक्षय कामडी, किशोर पिसे ,शुभम मोरे, आदी उपस्थित होते तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!