महाराष्ट्र सामाजीक

अन् चक्क तिच्या पालकांचा सत्कार करण्यासाठी घरी आयपीएस अधिकारी आले

ब्रम्हपुरी
त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून तिच्या यशामागच्या संघर्षाची कहाणी वाचली आणि एक आयपीएस अधिकारी थेट तिच्या घरी गेले. व तिच्या आईवडीलांचा सत्कार केला.
ही गोष्ट आहे रणमोचन येथे संपन्न झालेल्या सत्काराची.
या दुनियेतील अनेक स्वार्थी माणसांना दुसऱ्यांसाठी अजिबात वेळ नसतोच. पण आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीशी इमान राखून प्रशासनात कितीही मोठ्या पदावर विराजमान असलो तरी समाजाप्रती काही तरी आपलं देण लागत या भावनेतून समाजासाठी झटणारे फार कमीच माणस असतात.
परंतु ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन ह्या नदीकाठालगत असलेल्या गावातील मोनाली दिलीप ढोरे ह्या अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलीची केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड झाली. ज्या रस्त्यांनी पायी चालणे कठीण आहे. त्या रस्त्यांवरून पहाटेच्या काळ्याकुट्ट अंधारात एकट्या मुलीने धावण्याचा सराव केला. अडचणी आणि संकटे भरपूर होती मात्र परिस्थितीसोबत संघर्ष करीत त्या मुलीने देशसेवेचा व्रत हाती घेत सैन्यदलात भरती होण्याचा निर्धार केला. आणि तीची केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलात निवड झाली. आता ती तामिळनाडू येथे ट्रेनिंग घेत आहे.
हि बाब ब्रम्हपुरी शहरात जन्माला आलेले २०१६ च्या बँचचे महाराष्ट्र कँडरचे आयपीएस अधिकारी पवन बन्सोड यांना माहिती झाली. पवन बन्सोड हे सध्या राज्य राखीव पोलीस दल गट १३ चे कमांडींग आँफिसर म्हणून देसाईगंज जि.गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
त्यांना सदर बाब कळताच त्यांनी थेट रणमोचन येथे मोनालीच्या घरी जावून तिच्या पालकांचे अभिनंदन केले. पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. एक आयपीएस अधिकारी आपल्या घरी आले ह्या समाधानाने मोनालीच्या आईवडिलांचे उर भरून आले.
सदर सत्कारप्रसंगी राज्य राखीव पोलीस दल गट १३ चे कमांडींग आँफिसर डॉ. पवन बन्सोड, डी.वाय.एस.पी. जांभुळकर, पोलिस निरीक्षक ए.एन.रुपनारायण, पोलिस कल्याण अधिकारी पी.के.मिश्रा, ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, पत्रकार जिवन बागडे, पत्रकार नेताजी मेश्राम,, पत्रकार गोवर्धन दोनाडकर, पत्रकार राहुल मैंद, पत्रकार नंदु गुड्डेवार हे यावेळी उपस्थित होते.

—————————————
ग्रामीण भागातील मुलींनी घ्यावी प्रेरणा- आयपीएस डॉ.पवन बन्सोड
ग्रामीण भागातील अनेक मुलींना देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल व्हायची इच्छा असते.मात्र त्यांच्या मध्ये गुणवत्ता असुनही योग्य मार्गदर्शना अभावी त्या मागे पडतात. मोनाली कडून प्रेरणा घेत आता अन्य मुलींनी सुध्दा सैन्यदलात दाखल होण्यासाठी पुढे यावे.मनात कसलाही न्युनगंड ठेवू नये असे प्रतिपादन यावेळी आयपीएस डॉ.पवन बन्सोड यांनी केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!