चंद्रपूर जिल्हा घडामोडी

आणखी एक घोटाळा…भद्रावती येथील चांदा आयुध निर्माण सहकारी पतसंस्थेत घोटाळा उघडकीस….

lokwachak logo big

भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समिती द्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भद्रावती यांच्याकडे काही पतसंस्थेच्या भागधारकांनी दिल्या शिवाय जिल्हा उपनिबंधक यांच्यासह विभागीय निबंधक नागपूर यांच्याकडे तक्रारी दिल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी उपलेखापरिक्षक रवी मांढळकर यांच्याकडे सोपवली असता त्यांनी कर्मचारी भत्ता, हेल्मेट खरेदी,फर्निचर बांधकाम,बिल्डिंग मेन्टेनन्स,डाटा सेंटर इत्यादी प्रकरणात संचालक समितीचे

एस.व्ही. टेंगळे-अध्यक्ष,व्ही. डी. कांबळे – मानद सचिव यांच्यावर जवळपास 57.92 लाखांच्या उधळपट्टी चा ठपका ठेऊन तीन प्रकरणात फौजदारी कारवाई व एका प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्याचा अहवाल सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे सोपविला पण या प्रकरणात समितीच्या संचालकांकडून लाखो रुपये घेऊन सहाय्यक निबंधक यांनी ह्या प्रकरणात संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याने आता हे प्रकरण अतिशय गंभीर बनले असून एकूण 2700 सभासद असलेल्या पतसंस्थेत लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या संचालकांवर स्थानिक पोलीस स्टेशन येथे तक्रार करून गुन्हे दाखल करण्यास सहाय्यक निबंधक हे कधी पुढे येणार? हा प्रश्न आता एकूण 2700 सभासद विचारू लागले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!