नागभीड – नागभीड नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या चिखल परसोडी येथे रोशन कुंडलिक पाथोडे वय 32 वर्षे मौजा बोथली येथील युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यु झाला.
सविस्तर वृत्त असे आहे की चार ते पाच वाजताच्या दरम्यान रोशन हा चिखल परसोडी येथे अचानक काही कामानिमित्त आला परंतु गावातील काही भागातील विद्युत बंद होती ही गोष्ट रोशन च्या लक्षात येताच त्यांनी डबल फेस असलेल्या विदुतचा फक्त एकच फेस काढला व दुसरा फेस तसाच ठेवून गावातील चर्चेनुसार नशेच्या धुंदीत विद्युत पोल वर चढला.एक फेस सुरू असल्यामुळे तो त्या पोलवर चढल्या बरोबर त्याला विद्युत शाॅक लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला .रोशन पाथोडे हा घरगुती इलेक्ट्रिक दुरुस्तीचं काम करीत असे त्यामुळे त्याने पोलवर चढुन हे काम करण्यास तयार झाला अशी माहिती मिळाली.६ वाजताच्या दरम्यान पोलीस ठाणेदार मेढे हजर होऊन यांनी विद्युत विभागाला पाचारण करून शव खाली काढले व शव विच्छेदन साठी ना्गभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास नागभीड पोलिस स्टेशन करीत आहेत.
Add Comment