कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

11 एप्रिल : 305 कोरोनामुक्त 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू

11 एप्रिल : 305 कोरोनामुक्त 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू
11 एप्रिल : 937 पॉझिटिव्ह ; 11 मृत्यू

चंद्रपूर, दि. 11 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 305 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 937 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 11 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 33 हजार 529 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 759 झाली आहे. सध्या 5278 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 608 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 63 हजार 228 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील 67 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील 45 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 43 वर्षीय पुरुष व रामनगर येथील 63 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 29 वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील 50 वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 492 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 448, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

937 रुग्णांमध्ये चंद्रपूर
ठिकाण रुग्ण संख्या
चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 241
चंद्रपूर तालुका 45
बल्लारपूर 47
भद्रावती 22
ब्रम्हपुरी 56
नागभिड 32
सिंदेवाही 24
मूल 09
सावली 47
गोंडपिपरी 06
राजूरा 37
चिमूर 73
वरोरा 228
कोरपना 50
जीवती 07
इतर ठिकाणच्या 13
एकूण 937


नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!