मनोज गाठले — शेगाव बू .
स्थानिक शेगाव बू वरोरा तालुक्यातील वरोरा चिमूर उमरेड राष्ट्रीय महामार्ग 353- ई च्या सिमेंटरोडचे काम सुरू आहे.शेगांव मध्ये या कामा दरम्यान रोडवरील अतिक्रमन काढून रोडचे काम सुरू करण्यात आले होते.आता शेगांव मधील मेनरोडलगत नालीचे बांधकाम सुरू आहे.मात्र काही रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांनी यानाली बांधकामात अडचण आणण्यास सुरुवात करून रोड लगत असणाऱ्या दुकानासमोर अतिक्रमण करून दुकानदारावरचं दमदाटी करून अरेरावी करण्याचा प्रकार सुरू केल्याने दुकानदारानी याबाबत वरोरा तहसिलदार,शेगांव पोलीस स्टेशन,शेगांव ग्रामपचायत मध्ये दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्यासाठी तक्रार दिली आहे.
शेगाव येथील मेनरोड च्या रास्तारुंदीकरण व सिमेंटच्या रोडचे काम प्रगतीपथावर आहे त्याकरिता रोडवर असणाऱ्या अतिक्रमण काढण्यात आले होते.मात्र काही अतिक्रमण धारकांनी सुभाष पिपराळें, निशिकांत लोणकर,वैभव पदमावार यांच्या मेनरोड लगत असणार्यां दुकानासमोरचं अतिक्रमण केले आहे.दुकाना समोर अतिक्रमणबाबत या दुकानदारांनी वरोरा तहसीलदार यांच्या कडे तक्रार देऊन दुकाना समोर अतिक्रमण करणाऱ्याना अतिक्रमण करू देऊ नये याबाबत तक्रार दिली असता वरोरा तहसीलदार यांनी ग्रामपंचायत शेगाव यांना पत्राद्वारे या पीडित दुकानासमोर होणाऱ्या अतिक्रमण बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे मात्र रोडवर होणाऱ्या अतिक्रमनामुळे वाहतुकीस अडचण होत आहे कारण समोरच पेट्रोल पंप, बस थांबा असल्याने रोडवरील अतिक्रमनामुळे येथे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.या भविष्यातील धोक्याला ओळखून लोणकर,पिपराळें,पद्मावार या दुकानदारांनी रोडवरील अतिक्रमनाला विरोध दर्शविला मात्र अतिक्रमण धारक आताही रोडवरचं अतिक्रमण करून आहे.त्यात रोडलगत असणाऱ्या नालीचे बांधकाम करणाऱ्या एस आर के कंपनीच्या कामगारांसोबत हुज्जत घालून नालीचे बांधकाम सुद्धा अडविण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे.तर वैभव पद्मावार या दुकानदाराला धमकवण्याचा प्रकार या अतिक्रमण धारकांकडून करण्यात आल्याने ग्रामपंचायतने रोडवरील अतिक्रमण तात्काळ काढून मेनरोड मोकळा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Add Comment