महाराष्ट्र सामाजीक

शरद पवार साहेबच ओबीसींचे भले करु शकेल म्हणुन राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपुर :
ओबिसी, आदिवासी व ईतर समाज भ्रम निराश झाल्याने भारतीय जनता पक्षाशी नाराज आहे. तो कांग्रेस कडे वळू शकत नाही. त्यामुळे हा समाज राष्ट्रवादीला पसंत करीत आहे. कारण शरद पवार साहेबच ओबीसींचे भले करु शकतात. त्याच कारणाने मी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला असल्याचे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी येथे आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत मांडले.




राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दोन दिवसीय चंद्रपुर जिल्हा दौरा पार पडला. या दरम्यान स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक (दि.१९) ला पार पडली. यावेळी सर्वप्रथम जेष्ठ नेते शरद पवार यांची पत्रपरीषद पार पडली. व त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांसह आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी आपले मत मांडले.
यावेळी मा. प्रफुल पटेल, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निरीक्षक प्रविण कुंटे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, चंद्रपुर जिल्हा निरिक्षक प्रविण कुंटे, सुनिल फुंडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुध्दे, वसंतराव भुईखेडकर, ख्वाजा बेग, भालचंद्र चोपणे, डॉ. लोढा, जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महानगर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, रायुकांचे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर, उल्हास करपे, वर्षा निकम, जया देशमुख, आदी उपस्थित होते.



About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!