चंद्रपूर – विज निर्मिती केंद्रात काल रात्री 11 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भोजराज मेश्राम वय 59 असे मृत कामगाराचे नाव असून ते वैद्यनगर तुकुम येथे राहत होते.
ते सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे. काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी त्याचे शव मिळाल्याचे वृत्त आहे.
पट्टेदार वाघाच्या सिटीपिस मधील वावराने कामगारां मध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
Add Comment