चंद्रपूर जिल्हा घडामोडी

बल्लारपुर पोलिसांची धडक कारवाई…..

बल्लारपूर:-शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार उमेश पाटील आपले सहकर्मी सतीश पाटील व प्रसंन्नजित डोरलीकर यांचा सोबत रात्री पाळी गस्त करीत असताना महितीदार कडून खात्रीपूर्वक माहिती मिळाली की चंद्रपूर कडून निर्भय ट्रान्सपोर्ट लिहलेले ट्रक मधून अवैध दारूचा साठा बल्लारपुर शहरात दाखल होत आहे त्या आधारावर ठाणेदार पाटील यांनी रात्री एक वा, दरम्यान आपले पोलीस अधिकारी API धर्मेंद्र जोशी व पोलीस कर्मचारी परचाके,माथनकर, शरद कुडे, आनंद घिवे ,गणेश पुरडकर आणि पंच न, प, कर्मचारी शब्बीर अली जब्बार अली(45)प्रदीप सिंग महरोलीया यांना सोबत घेऊन चौका चौकात ट्रक ची वाट बघत होते, काही वेळातच ट्रक येतांना दिसले बामणी टी पॉईंट वर ट्रक ला अडविण्यात यश आले ,ट्रक ड्राइव्हर ला विचारपूस केली असता ट्रक ड्राइव्हर ने सांगितले की ट्रक खाली आहे पोलिसांनी ही ट्रक तपासले असता ट्रक खाली होते पण खात्रीपूर्वक माहिती असल्याने पोलिसांनी पुन्हा तपासणी केली असता ट्रक मध्ये वेगळा खाचा करून त्यात अवैध दारू लपवून ठेवलेली आढळून आली.

पंच समक्ष ट्रक क्र, MH BG-5131ला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले ट्रक ची झडती घेतली असता त्यात 210 पेटी देशी दारू अ,की 21 लाख, ऑफिसर चॉईस ची 25 पेटी अंदाजे की 5 लाख, स्टालिंग रिझर्व्ह बी,7 chi 4 पेटी अंदाजे की 57 हजार ,टाटा कं, चा ट्रक अंदाजे की 25 लाख, जुना मोबाईल की 10 हजार रु असे एकूण 41 लाख 77 हजार रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपी ट्रक ड्राइवर धर्मेंद्र प्रकाश खोब्रागडे(19)रा, रमाबाई नगर अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर, याला अटक करून कलम 65(अ)83,मादाका सह3/181,52/191,130/177 मो वा का गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, SDPO राजा पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार उमेश पाटील यांचा मार्गदर्शन खाली पुढील तपास ट्रक मधील भरलेली अवैध दारू कुणाची आहे व कुठे खाली करणार आहे आणि कुठून आणलेली आहे याचा तपासAPI शैलेंद्र ठाकरे करीत आहे. निर्भय ट्रान्सपोर्ट चे मालक राजू दारी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की पोलीस नि जप्त केलेली निर्भय ट्रान्सपोर्ट लिहलेली ट्रक गाडी ही आमची नाही. पोलिसांनी असे नाव लिहून अवैध व्यवसाय करणाऱ्या वर कडक कारवाई करावी.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!