प्रतिनिधी नेरी
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या वडसी येथील केशव ढोने यांच्या गोट्यावर वाघाने हल्ला चढवून गोठयात बांधलेल्या बैला ला ठार केले आणि ओढत दूर नेले या घटनेमुळे बैल मालकावर आभाळ कोसळले बैल मरण पावल्यामुळे शेती कशी करायची असा प्रश्न बैलं मालकाला पडला आता काय करावे या विवंचनेत असताना वडसी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब या क्षेत्राचे लाडके आमदार बंटीभाऊ भांगडीया कळविताच जनसेवे चे विडा उचलण्याऱ्या आणि जन सामन्याच्या गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदारसाहेबांनी तात्काळ बैल मालकाला आर्थिक मदत जाहीर करीत कार्यकर्त्यांच्या हस्ते बैलमालकाला मदत देऊन मदतीचा हात दिला
यावेळी मदत देताना भाजप महिला अध्यक्ष सौ मायाताई ननावरे, जी प क्षेत्र प्रमूख प्रवीण गणोरकर, विनोद चोखरे ,रामेशजी कंचर्लावार, भारती गोडे ,आणि भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Add Comment