चंद्रपूर: कोरोना संकटात लॉकडाऊन असल्याने राज्य शासनाने मार्च महिन्यात सर्वप्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या.त्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 580 ग्राम पंचायतीवर प्रशासकांची नियुक्त केली गेली.परंतू आता ग्राम पंचायतीमध्ये अंतीम मतदार याद्याची प्रक्रिया पुर्ण करून निवडणुक आयोगाने शुक्रवारी निवडणुक कार्यक्रम जाहिर केलेला आहे. त्यानुसार आता राज्यासह चंद्रपूर जिल्हयातील 580 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुक जाहीर होताच ग्रामीण राजकिय वातावरण तापणार असून मोर्चा बांधणीला वेग येणार आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपत नाही तोच आता 11 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. अधिसुचना प्रसिध्द होताच जिल्हयात आचार संहिता लागू होईल. मागील काही दिवसात जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 580 ग्राम पंचायतींत मतदार यादीचा कार्यक्रम पुर्ण झाला. त्यामुळे जवळपास डिसेंबर महिन्यातच सर्व ग्राम पंचायतींमध्ये अंतीम मतदार यादी प्रसिध्दी होईल व याच काळात ग्राम पंचायतींत आयोगाव्दारे सार्वत्रिक निवडणुक जाहीर होण्याची शक्यता याआधिच वर्तवण्यात आली होती.
या ग्रामपंचायतीमध्ये होणार निवडणुका
चंद्रपूर तालुक्यात -37,भद्रावती-54,वरोरा-65,चिमूर-76,ब्रम्हपुरी-68,नागभिड-41,सिंदेवाही-43,सावली-50,मुल-31,गोंडपिपरी-39,पोंभूर्णा-21,बल्लारपूर-10,राजुरा-27,कोरपना-17 आणि जिवती -01 प्रशासक नियुक्ती करण्यात आले आहे. यासाठी लवकरच मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.
Add Comment