कोविड -१९ या प्रादुर्भाव कमी होत नसतांनाच, या काळात सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सोशल मिडीया द्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मेसेंजर तयार करून पैशाची मागणी, व्हाट्सअँप द्वारे चॅट्स करून ब्लॅकमेलिंग , ऑनलाईन वॉलेटची, केडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमीष अशी कारणं देत साथर गुन्हेगाराकडून सर्व सामान्य लोकांची फसवणूक होत असल्याचीउदाहरण समोर येऊ लागले आहेत.
त्यातच दिनांक १६/११/२०२० रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने चंद्रपूर जिल्हा पोलिसांची अधिकृत फेसबुक आय डी “SP Chandrapur”” वरील प्रोफाईल आणि फोटोची कॉपी करून त्याच प्रकारे दिसणारी नविन बनावट/खोटी फेसबुक आय डी तयार करून प्रथम अधिकृत फेसबुक मधील फेसबुक मित्रांना request पाठवुन त्यांना आर्थीक अडचणीची बहाना करुन पैशाची मागणी करून गुगलपे, फोन पे द्वारे पैसे पाठविण्यास विनंती करीत असल्याचे निदर्शनास आल्याने या संबंधी पोलीस ठाणे रामनगर येथे अज्ञात इसमांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात येथील आरोपीचा तपास सुरु आहे.
तरी आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी अशा भुलयापास बळी पळुन कोणत्याही प्रकारचा आर्थीक व्यवहार करु नये. प्रथम पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील १०० कमांकावर कॉल करून खात्री करून अशा प्रकाराची माहिती दयावी.
कोरोना काळात बहुतांश लोक घरून काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी सुध्दा लोकांची खटपट सुरु असल्याने नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे सायबर गुन्हे घडत आहे. काही सायबर गुन्हेगार सोशल मिडीयाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करून पैशाची मागणी, व्हॉटसअप द्वारे चेंटींग करून व्लैकमेलीग करणे तसेच नोकरीकरीता बनावट वेबसाईट बनवून शासनाच्या विविध योजना असलेली बनावट वेबसाईट तयार करणे, ओएलएक्स फ्रॉड, त्याचप्रमाणे एटीएम, डेबीड कार्ड, केडीट कार्ड केवायसी अपडेट अशी कारणं दाखवत होणान्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या ऑनलाईन गुन्हे मध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
सदरचे सायबर गुन्हेगार विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मुलं मुली यांना लक्ष करत असल्याचे दिसत आहेत. लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन खरेदीच्या प्रकारात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारची पेमेंट ऑनलाइन करण्यावरच भर देत आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोटया शोपिंग वेबसाईट ही तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठी सरकारकडून भत्ता मिळेल अशी आमिष दाखविली जात असून खोटया वेबसाईट तयार करून नोकरी गमावलेल्या लोकांना सायबर गुन्हेगार मोठया प्रमाणत लक्ष्य करत आहेत.
याबाबत सर्व सामान्य नागरिकांनी अत्यंत जागरूक राहणे आवश्यक आहे.
Add Comment