चंद्रपूर जिल्हा घडामोडी

भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही.. देशी -विदेशी दारूसाठ्यासह 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त…

पुंडलिक येवले

द्रावती शहरातील गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलिया जवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना पाच मोटर सायकल स्वारांसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून चार लाख 60 हजाराचा मुहेमाल जप्त केला ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.





यातील करण भास्कर मिटपल्लीवार वय 25 वर्ष, गोलू टिल्लू मक्केवार वय 22 वर्ष, मालन बाई भास्कर मिटपल्लीवार वय 50 राहणार गवराळा भद्रावती, कार्तिक दिलीप वनकर वय 22, मयूर गजानन बल्लूर वार वय 18, केवल सरोज गौरकार वय 18 राहणार वनी यवतमाळ, महेश महादेव समर्थ वय 28 किसन गणपत बावणे वय 22 राहणार बल्लारशा असे आरोपीचे नाव आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वणी मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे गवराळा रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला असता पाच मोटर सायकल वर देशी विदेशी दारू साठा सह मुद्देमाल चार लाख 60 हजार जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे ,निकेश ढेंगे ,हेमराज प्रधान, शशांक बदामवार यांनी केली.
















About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!