रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर जप्त भद्रावती तहसील कार्यालयाची कारवाई
April 23, 2021
80 Views
1 Min Read
रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर जप्त
पुंडलिक येवले
(भद्रावती तालुका प्रतिनिधी)
कोरोना प्रदूर्भावाच्या काळात प्रशासन व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत तालुक्यातील विविध ठिकाणाहून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना रंगेहाथ पकडून चालक तथा मालकावर येथील तहसील कार्यालयाद्वारे नुकतीच कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण आठ ट्रॅक्टर ताब्यात घेवून ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सध्या कोरोना प्रदूर्भावात स्थानिक प्रशासन व्यस्त असल्यामुळे अवैध रेतीतस्करांचे चांगलेच फावत आहे. याचा गैरफायदा घेत भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव , बरांज,वायगाव येथील रेती घाट व इतर परिसरातील अवैध रेती तस्करांनी अवैध रेती तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू केला होता. यांच्या अनेक तक्रारी येथील राजस्व विभागाला प्राप्त झाल्या होत्या. शेवटी याची दखल घेत तहसील प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली.व सात ब्रास रेती जप्त करण्यात आली.
जप्त केलेले ट्रॅक्टर्स एम.एच ३४ एल६७८७, एम.एच ३४ बी.आर.५८३८, एम.एच ३४ ए.पी.३३२८, एम.एच ३४ ए.पी.२५७२ या क्रमांकाचे असून त्यांचे मालक दिनकर माथनकर, ईश्वर धांडे, वसंता उमरे, वसंता कोहळे, उमाकांत तळवेकर, नयन जांभूळे, देवानंद ठावरी, शाहरूख खाॅं पठाण हे आहेत. सदर कारवाईत ट्रॅक्टर ड्रायवरांना विचारणा केली असता. ट्रॅक्टर मालकांचे नाव समोर आले. याबाबत तहसील प्रशासन पुढील कारवाई करणार आहे असे तहसीलदार शितोळे यांनी सांगितले आहे.
Add Comment