८३ ग्राम पंचायत पैकी ५१ ग्राम पंचायत वर भाजपचा झेंडा
चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
चिमूर तालुक्यातील अंतिम टप्प्यातील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुकीत
भाजपचे आमदार बंटीभाऊ भांगडीया पॅनल ने १४ ग्राप वर वर्चस्व प्राप्त करीत एकूण ८३ पैकी ५१ ग्राम पंचायत वर भाजपचा झेंडा रोवला असून वर्चस्व ठेवण्यात यश प्राप्त केले
अंतिम टप्प्यात झालेल्या निवडणुकीत खांबाडा ग्राम पंचायत सरपंच काजल ननावरे उपसरपंच मंगेश धाडसे, म्हसली सरपंच संकेत सोनवाने उपसरपंच प्रमोद खोब्रागडे, बोथली (शिरपुर) सरपंच मनोहर चौधरी उपसरपंच रामचंद्र झोडे, महालगाव (काळू) सरपंच अनुसया ननावरे उपसरपंच रामराव ननावरे , गोंदेडा सरपंच गिरीजा गायकवाड उपसरपंच साधना डांगे , लोहारा सरपंच दीक्षा पाटील उपसरपंच गीता जांभूळे , कोलारा सरपंच शोभा कोयचाडे उपसरपंच सचिन डाहुले ,वडसी सरपंच अन्नपूर्णा मादांडे उपसरपंच वनिता रामटेके , काजळसर सरपंच आशिष ननावरे उपसरपंच अशोक खोब्रागडे, सातारा उपसरपंच गजानन गुळधे, पुयारदंड सरपंच बेबी पारधी उपसरपंच सुनील नैताम ,केवाडा सरपंच दीपिका गुरनुले उपसरपंच कल्पना राजनहिरे खानगाव सरपंच अर्चना रामटेके, पेठ भांसुली सरपंच तुळजा श्रीरामे अश्या १४ ग्राम पंचायत वर भाजपने वर्चस्व प्राप्त करीत पहिल्या टप्प्यात १७ ,दुसऱ्या टप्प्यात २० ग्राम पंचायत काबीज करीत एकूण ८३ पैकी ५१ ग्राम पंचायत मध्ये भाजप आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पॅनल ने वर्चस्व प्राप्त करण्यात यश आले आहे .
तालुक्यातील ५१ ग्राम पंचायत मध्ये भाजपने वर्चस्व प्राप्त केले असून काही ठिकाणी थोड्या फरकाने विजयापासून वंचित राहिले आहे .
या निवडणुकीत भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, युवा नेते समीर राचलवार,
भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले तर भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, जिल्हा सचिव राजू देवतळे जीप क्षेत्र प्रमुख विनोद चोखरे, प्रवीण गणोरकर, अविनाश बारोकर ,नितीन गभने संदीप पिसे प्रवीण गणोरकर रमेश कंचर्लावार ,यांनी विशेष प्रयत्न केले.
अशी माहिती भाजप जनसंपर्क कार्यालातून अरुण लोहकरे यांनी प्रसिद्ध केली आहे
Add Comment