पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

रानटी डुकराच्या शिकारी साठी गेलेल्या दोन आरोपींविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी केली कारवाई

ब्रह्मपुरी:

रानटी डुकराच्या शिकारीसाठी बारूद गोळा शेत शिवारात अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली त्यात अज्ञात आरोपीची मोटार सायकल घटना स्थळावर आढळून आल्याने त्या आधारावर तपासाची चक्रे वेगाने फिरवित आरोपी नावे संजय नामा केडेलवार वय(३५)व अनिल मुखरू खेडकर वय (३३) रा. इंदिरानगर बर्डी आरमोरी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी विरुद्ध अ. क्रं.
६७/२३ भांदवि क.४२९,३४ अंतर्गत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
ब्रह्मपुरी पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज येथील फिर्यादी संतदास रामदास नखाते व जनार्दन विठोबा ठाकरे यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेतशिवारात चराईसाठी बैल व गाय नेली असता . गांधिनगर आरमोरी बर्डी येथे वास्तव्याने राहत असणाऱ्या दोन आरोपींनी रानटी डुकराच्या शिकारी साठी निलज-पाचगाव शेत परिसरामध्ये बारूद भरलेले गोळे अत्यवस्थ अवस्थेत डुकरांसाठी टाकले होते. मात्र रानटी डुक्कर ऐवजी ते बैल गायीने खाल्ल्याने तोंडात तो गोळा फुटून बैल व गाय गंभीर जखमी झाले त्यानुसार फिर्यादी नी वन विभागाला सूचना करीत ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत तपासाची चक्रे वेगाने फिरवित दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अ. क्रं.६७/२३ कलम४२९.३४ अंतर्गत गुन्हा नोंद करीत कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!