क्राइम

ब्रम्हपुरी पोलिसांची धडक कारवाई…मुद्देमालासह १ लाख ८४ हजारांची अवैद्य दारु जप्त

ब्रम्हपुरी पोलिसांची कारवाई

ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुद्देमालासह १ लाख ८४ हजार४०० रुपयांची अवैद्य दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून पोलिसांनी ब्रम्हपुरी शहरातील हत्तीगोटा चौक येथे नाकाबंदी केली. त्यावेळी समोरून येत असलेल्या मारूती ८०० कंपनीच्या एम.एच. ३१ सी.एम.१३५५ या चारचाकी वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ६७२ नग देशी दारु किंमत १ लाख ३४ हजार ४०० रुपये व चारचाकी किंमत ५० हजार असा एकूण १ लाख ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनकुमार खेडीकर, पोलीस शिपाई अनुप कवठेकर, दयाराम घरत यांनी केली आहे.

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!