दिनांक 11/12/2020 ला कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर ला चंद्रपूर जिल्हा दव-याचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर ला सदीच्छा भेट दिली. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती, श्री दिनेश दादापाटील चोखारे व उपसभापती श्री. रणजीत बापुजी डवरे यांनी ग्रामिन कॉग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष, श्री. प्रकाशभाऊ देवतळे, नंदुभाऊ नागरकर, बाजार समितीचे संचालक, श्री. चंद्रकांत गुरू, श्री. निरज बोंडे, श्री. गोविंदा पोडे, श्री. योगेश्वर बोबडे, श्री. प्रभाकर सिडाम, श्री. अरविंद चवरे, संचालिका सौ. अल्काताई वाढई, सौ. शोभाताई वरारकर, बाजार समितीचे सचिव श्री. संजय सरदार पावडे, आणि किसान कॅग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनु.जाती कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष पवण अगदारी, गणेश आवारी, प्रमानंद जोगी, भरत ताणकर, चंदु माथणे, प्रभाकर ताजने, हितेश लोडे, सुबोध कासवटे, सुधाकर वरारकर, राष्ट्रीय ओ.ब.सी. महासंघ सचिव सचिन राजुरकर, काँग्रेस पक्षाचे कार्यकरते आणि शेतकरी बांधव यांचे प्रमुख उपस्थितीत श्री. विजयभाऊ वडेट्टीवार हयांचे शाल, श्रीफळ, व श्रीगणेशाची मुर्ती देवून स्वागत केले.
श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते बाजार समितीचे मुख्य बाजार स्थळावर धान्य चाळणी यंत्राचे भुमिपूजन व फळे बाजारमधील सिमेंट कॅक्रीट रोडचे भुमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी श्री. विजय वडेट्टीवार हयांनी सर्व पदविधर बांधवांचा श्री. अभिजित वंजारी यांना नागपूर विगातील पंदविधर मतदार संघातुन आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल आभार मानले तसेच, बाजार समितीचे सभापती श्री. दिनेश दादापाटील चोखारे यांचे वंतीने बाजार समितीचे उपबाजार चिचपल्ली मौजा अजयपूर व उपबाजार कोठारी येथे शासकिय 10 एकर जमिन मिळणे बाबत चे निवेदल दिले. सदर मागणीला दुजोरा देवून श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शासकिय 10 एकर जागा शेतक-याचे हिताचे दृष्टीने, उपबाजारा करीता देवू असे आश्वासन देण्यात आले. बाजार समितीमध्ये शेतक-यांना देण्यात येणा-या सुविधेबाबत माहिती घेतली व शेतक-यांच्या हिताच्या व उन्नतीच्या
दृष्टिने कुठल्या योजना राबविल्या पाहीजे या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री गणेश आवारी यांनी केले. तथा बाजार समितीचे सभापती श्री दिनेश दादापाटील चोखारे यांनी आभार व्यक्त केले.
Add Comment