राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असुन या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणुन त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Add Comment