महेश पानसे.
(विदर्भ अध्यक्ष राज्य पत्रकार संघ)
पाणी वाहून गेल्यावर भूदुक् बुजवायची प्रशासनाला व् पर्यायाने नेत्यांना लागलेली सवय नवीन नाहीच.आशिया खंडातिल सर्वात मोठ्या व् चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी बांबू प्रशिक्षण केंद्र जळून खाक झाल्यानंतर जें प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत ते बघता आधी सारे झोपले होते काय? हा सवाल सर्वसामान्य जिल्हावासीयाना पडल्यास नवल नसावे.हजारो कामगारांना रोजगार देऊ शकेल असा हा स्वप्नाली प्रकल्प आता दिवास्वप्न बनून राहिला,करोडों पाण्यात गेले मात्र
इथे येणारा नेता मात्र निव्वळ म्हातारी मेल्याचे दुःख व्यक्त करून , चौकशी ची मागणी करून पुढे जात आहे.
घातपात, कृत्रिम की नैसर्गिक अपघात
याचा छड़ा लावावाच् लागेल मात्र त्याआधी जिल्ह्यातील हजारो कारागीर,कामगार,बांबू उत्पादक यांचे
बेछिराख् झालेल्या आशा-अपेक्षा जिवंत कशा ठेवता येतील यावर भाष्य
करण्यास् साऱ्या नेत्यांनी पद्धत शिरपने बगल दिली दिसते.
बांबू प्रशिक्षण केंद्राकरीता निवडलेली जागा चुकीची होती,फायर यंत्रना नव्हती,ताडोबा क्षेत्र
लागुन असल्याने वनव्याची भीती होती,बांबू अग्निरोधक प्रक्रिया केलेले नव्हते….वैगेरे शंका सत्ताधारी उपस्थित करीत आहेत तर उच्चस्तरिय्
चौकशी ची मागणी विरोधक करीत आहेत..हाद्सा होण्याआधी हे सारे डॊळे मिटून का बसले होते? आपल्या
जिल्ह्यातील हा जगप्रसिध्द् प्रकल्प,जिल्हावासियांना चिरकाल पोट भरण्याचे साधन ठरु शकनारा हा “ड्रीम
प्रोजेक्ट” यांनी गंभीर तेने का घेतला नाही? हा संतापजनक् सवाल उपस्थित झाला आहे.
माजी अर्थमन्त्री ,वनमन्त्री,पालकमन्त्री आ. सुधीर भाऊंना या महत्वकांक्षी प्रकल्पाची क्रेडिट जाते हे खरे असले तरी मात्र सम्बधित विभागाने या नाजुक् प्रकल्पास् पूर्ण सुरक्षा दिलेली दिसली नाही.राज्यात सत्तान्तर् झालेनन्तर आता उपस्थित केलेल्या दोषांची दुरुस्ती विद्यमान पालकमंत्र्यांना(संबधीत विभाग्) करतां आली नाही हे सुद्धा नाकारायला जनता तयार नाही.
तत्कालीन भाजपा सरकारने या
मह्त्वाकांक्षी प्रकल्पाकरीता ९१ कोटीं मंजूर केले होते.सत्ता बदलानतर् पैशाची कमतरता सुरु होऊन कामं कसवगतिने सुरु होते हे विशेष.
बांबू प्रशिक्षण केंद्राची हि महत्वाकांक्षी योजना राजकिय चढाओढीच्या महवांकाक्षेने स्वप्नच् बनून राहते की काय? हि भीती
जिल्हयातील जनतेच्या मनात घर करू लागल्यास नवल नसावे.
Add Comment