शेगाव बू – मनोज गाठले
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती एक दिवसावर येऊन ठेपली असून सर्व बौद्ध बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण सुरू झाले असून भीम जयंती गाजा वाज्यात , आनंदात साजरी करणार असल्याचे दिसत असल्याने कोविढ १९ कोरोणा संसर्ग जन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन लोकजमाव टाळून घरातच भीम जयंती साजरी करण्याचे आव्हान शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांनी केले आहे . स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत १०१ गाव खेडे येत असून प्रत्येक गावात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी बंदोबस्तात देणे अशक्य असून पोलीस प्रशासनाला गावातील नागरिक यांनी सहकार्य करावे त्या करिता प्रत्येक गावातील नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून शक्यतो लोक जमाव गर्दी टाळावी , विनाकारण फिरू नये , गावात कुटुंबात सुद्धा मास्क चा वापर करावा , वारवर साबण तसेच हॅण्ड वाष स्यानिटायझर चा वापर करा . ही सर्व मोहीम जनतेच्या हिताचे असून या मोहिमेला जनतेनी च सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक पोलीस पाटील , तंटा मुक्ती समिती , ग्राम पंचायत चे पदाधिकारी , यांना कळविण्यात आले आहे . विशेष म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे दिवाळी दसरा सनापेक्ष्याही अधिक महत्त्वाचा दिवस असतो तर या दिवशी सर्व बोध्द बांधव सफेद वस्त्र धारण करून बाबा साहेबाला अभिवादन करतात तर प्रत्येक गावातील विहारामध्ये अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम सुधा असतात तर बँड बाज्यसह गावात भव्य मिरवणूक देखील काढली जातात . तर भीम जयंती दोन दिवस बोध्द बांधव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करतात . परंतु यावर्षी कोरोना महामारी संसर्ग जन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन शासनाच्या नियमाचे उलघन न करता सर्व बोद्ध बांधवांनी शांततेत साजरी करावी . शक्यतो आपल्या घरीच बाबा साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार , अगरबत्ती , मोमाबत्ती , मिठाई वाटून , बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात यावे . विशेष म्हणजे या दिवशी भारताचे साविधान चे वाचन करून , बाबा साहेब यांच्या जीवन चरित्राचे पुस्तके , पेन , अश्या वस्तू एक मेकांना भेट देऊन भीम जयंती साजरी केली तर खरोखरच प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती होऊन बाबा साहेबांचे विचार प्रत्येक घरा पर्यंत पोहाचतील .
Add Comment