चंद्रपूर जिल्हा घडामोडी महाराष्ट्र

दिवाळी साधेपणाने साजरी करा राज्य शासनाने दिल्या मार्गदर्शक सूचना

चंद्रपूर: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिवाळी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात ते आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. या वर्षीचा दिवाळी उत्सव कोविड कालावधीत साजरा केलेल्या अन्य उत्सवा प्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग व संक्रमण वाढणार नाही. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदूषणाचा परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे, ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालूवर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

दिवाळी उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम, दिवाळी पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे, रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये याची दक्षता घेण्यात यावी, असेही परीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वरीलप्रमाणे दिवाळी सण साधेपणाने साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
error: Sorry !! Content is Copyright protected !!