चंद्रपूर-व्यसनाधीन व्यक्तिला व्यसन हा एक आजार आहे हे पटवून त्यांना व्यसनापासून सावरण्याचे आणि परावृत्त करण्याचे काम ‘झेप-व्यसनमुक्ती’ केंद्रातर्फे केले जाते. या कार्याची दखल घेत सर्वोदय शिक्षण मंडळद्वारा संचालित स्व. सुशिलाबाई मामीडवार रामचंद्रराव कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली येथील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून’ झेप-व्यसनमुक्ती’ केंद्रात कार्यरत असणाऱ्या कर्तुत्वान महिला कर्मचाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
महिलांनी जीवन जगताना सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगावा. चुल आणि मुल ही प्रथा नष्ट करण्यासाठी महिलांनी पुढे येऊन शिक्षण घ्यायला हवा. जागतिक महिला दिनी यंदाची थीम ही ‘लिंग समानता’ आहे. मात्र आजही समाजात मुलगा-मुलगी हा भेद बघावयास मिळते. मुलगा हा वंशाचा दिवा आहे हे आपण मनात बिंबवला आहे. हा भेदभाव दूर सारण्यासाठी प्रत्येक महिलानी स्वतः च्या कुटुंबा पासूनच सुरुवात करायला हवी.दिवसेंदिवस स्त्री-भ्रूण हत्येचा प्रमाण वाढलेला आहे. महिलांना जर हव्या त्या गोष्टीचा व अधिकारांचा स्वातंत्र मिळाला की, नक्कीच त्यांचा जीवनमान उंचावेल,असे मत कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ठाकुरवार यांनी केले.
कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी व्यसनाच्या आहारी गेलेला असला तरी त्याचा त्रास हा संपूर्णतः कुटुंबांला होत असतो. अश्या वेळी खचून न जाता त्या व्यसनाधीन व्यक्तिवर योग्य वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. या करिता कुटुंबातील महिलांनी योग्य तो पुढाकार घ्यावा, असे विधान अध्यक्षीय भाषणात गीता पालीवार यांनी केले.
समुपदेशन करताना बर्याच गोष्टीचा सामना करावा लागतो. व्यसनाधीन व्यक्ति जेव्हा आपल्याला त्याची एक मैत्रीण, बहीण, आई समजून मनातील भावना व्यक्त करत असतो. तो व्यक्ति जेव्हा माझ्या हातून सुधारतो आणि व्यसनापासून दूर होत आनंदी जीवन जगण्यास सुरुवात केलेला आहे हे बघितल की, आपण केलेल काम हे मोलाच आहे आणि खर्ऱ्या अर्थानी सार्थकी ठरलेल आहे असे वाटते, असे मत समुपदेशक सुनीता बोठाने नी उपस्थित महिलांसमोर व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात एस. आर. एम. सोशल वर्क कॉलेजचे विद्यार्थी, झेप येथील कर्मचारी आणि धन्वंतरी महिला ग्रुप चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत दुर्गे यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशाल काळे यांनी केले.
‘झेप-व्यसनमुक्ती’ केंद्रात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा.


Add Comment