कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर जिल्हा घडामोडी

नुतन वर्ष साजरं करताय? सावधान…

चंद्रपूर -सर्व सामान्य जनतेला आव्हान करण्यात येते की, कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर

“ओमीक्रॉन” ही नविन प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा नविन धोका निर्माण झाला आहे. या विषाणूचे संक्रमण सामान्य नागरीकांमध्ये / रहीवाशांमध्ये फार मोठ्या तिव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून ३१ डिसेंबर २०२१ (वर्ष अखेर) व नुतन वर्ष २०२२ ला मोठया प्रमाणात एकत्र न येता किंवा प्रशासनाने लागु केलेल्या कलम १४४ सीआरपीसी. अन्वये ५ किंवा ५ पेक्षा अधिक इसम एकत्र न येता नविन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षीत आहे.

उपरोक्त प्रमाणे नववर्ष निमित्त पोलीस विभागामार्फत चंद्रपूर शहरात एकुण २३ ठिकाणी फिक्स पॉईट, १५ ठिकाणी नाकाबंदी व १७ ठिकाणी चारचाकी, दुचाकी तसेच पायदळ पेट्रोलींग पॉईट लावण्यात आले असुन वाहतुक शाखेमार्फत अतिरिक्त एकुण १४ ठिकाणी फिक्स पॉईट व पेट्रोलींग पॉईट लावण्यात आले असुन एकुण ३२ अधिकारी व २७० पोलीस अंमलदार बंदोबस्तकरीता रस्त्यावर राहणार आहेत.

बंदोबस्त दरम्यान कोणीही दारू पिऊन वाहन चालवितांना मिळुन आल्यास Drunk and Drive ची कार्यवाही तसेच नियमाचे उल्लंघन करून उपद्रव माजवुन मिळवुन आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक, श्री. अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्व नागरीकांना आव्हान आहे की, त्यांनी नुतन वर्ष अभिनंदन अत्यंत साधेपणाने व स्वतःच्या घरीच साजरा करावा.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!