चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन ज्ञानभवन ठरावे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : नवीन इमारतीचे लोकार्पण

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असे परिवर्तन करणारे प्रत्येक थोर पुरूष पत्रकारच होते. पत्रकाराची शक्ती ही क्रांतीची शक्ती असते. नाकारात्मकते  कडून साकारात्मकते कडे जाताना पत्रकारितेला मिशन समजून चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन ज्ञानभवन ठरावे, ही इमारत जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे शक्तीकेंद्र ठरावे, अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्या नवीन इमारतीचे  लोकार्पण रविवारी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार, उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्­नेश्­वर यांची उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्­या अर्थमंत्री पदाच्­या काळात वैशिष्­ट्यपूर्ण निधीतून २ कोटी रुपये खर्चून या पत्रकार भवनाचे बांधकाम काम करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्­हणाले, आज मुद्रण पत्रकारितेसमोर व्हाट्सएप्प विद्यापीठाचे मोठे आव्हाहन आहे. जातीधर्मांमध्­ये तेढ निर्माण करणे, कपोलकल्­पीत बातम्या तयार करून समाजामध्ये  विद्वेष निर्माण करण्­याचे काम जोमाने सुरू आहे. या विरोधात लढा देत सत्याच्या बाजूने उभे राहण्याची जबाबदारी पत्रकार बांधवांवर आहे. आपली लेखणी प्रभावीपणे शोषणाच्­या विरोधात वापरण्याची , पत्रकारितेला मिशन समजून समाजातील दुष्­प्रवृत्­तीचे निर्मुलन करण्­यासाठी आपली लेखण वापरण्याची जबाबदारी पत्रकार बांधवांवर आहे. माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्­नमवार यांची जयंती आहे. कन्­नमवारांनी संघर्षाच्­या काळात घरोघरी वृत्तपत्र वितरित केले व संघर्षसिध्­दतेतून मुख्­यमंत्री होत महाराष्­ट्राच्­या विकासात मोठे योगदान दिले, अशा ज्­येष्­ठांचा आदर्श ठेवत मार्गक्रमण करण्­याचीआवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली.

कार्यक्रमाचे प्रास्­ताविक श्रमीक पत्रकार संघाचे अध्­यक्ष संजय तुमराम यांनी केले. यावेळी बोलताना संजय तुमराम म्­हणाले, पत्रकार बांधवांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले स्­वप्­न पूर्ण झाले. आ. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना आम्­ही त्­यांच्­याकडे मागणी केली, त्­यांनी त्­वरित ती पूर्ण केली. या इमारतीच्­या बांधकामासाठी २ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. दिलेला शब्­द पूर्ण करणारा नेता म्­हणून त्­यांची ख्­याती आहे. त्­यांचा हा लौकीक पुन्­हा एकदा सिध्­द झाला असल्­याची भावना संजय तुमराम यांनी यावेळी व्­यक्­त केली.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार यांचीही भाषणे झालीत. जनसामान्यांना न्याय देण्याचे काम या पत्रकार भवनातून व्हावे अशी अपेक्षा महापौर कंचर्लावार यांनी व्यक्त केली. तर आमदार जोरगेवार यांनी जनतेच्या हिताचे लिखाण या भवनातून व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या पत्रकार भवनाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी महापौर अंजली घोटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उदय भोयर, कंत्राटदार सचिन डवले यांच्­यासह ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सुदर्शन बारापात्रे, स्पर्धेचे प्रायोजक नीरज शर्मा, अमित पुगलिया यांचाही सन्­मान यावेळी करण्­यात आला. श्रमिक पत्रकार संघातर्फे लॉकडाऊनदरम्­यान ऑनलाइन चित्रकला स्­पर्धेचे आयोजन करण्­यात आले होते. या स्­पर्धेतील विजेत्­यांना मान्­यवरांच्­या हस्­ते पारितोषीके प्रदान करण्­यात आले. कार्यक्रमाचे संचालन आशिष अंबाडे यांनी केले तर आभार सचिव प्रशांत विघ्­नेश्­वर यांनी मानले.

कार्यक्रमाला माजी उपमहापौर संदीप आवारी, संजय कंचर्लावार, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, प्रा. सुरेश चोपणे, अरुण तिखे, श्रमीक पत्रकार संघाचे ज्­येष्­ठ सदस्­य सुनील देशपांडे, बाळ हुनगुंद, प्रमोद काकडे, महेंद्र ठेमस्­कर, महानगरपालिकेतील नगरसेकव, नगरसेविका, विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!