शेगांव बू — प्रतिनिधी , मनोज गाठले …
स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चार गाव बू ग्रामपंचायत सरपंच पदाची नियुक्ती करण्यात आली तर यावेळी सरपंच पदी श्री योगीराज लक्ष्मण वायदुळे , तर उप सरपंच पदी संगीता पत्रुजी मंगाम् याची सर्वानु मते निवड करण्यात आली . तर यावेळी श्री रामदास किसन डाहुले , अजय ताराचंद बगडे ,. सौ विद्या विठल तुरांनकार , सौ शालू ताई भलमे . सौ मंगला विनोद घानोडे , यांची अविरोध सदस्य पदी निवड करण्यात आली. येथील ग्राम विकास अधिकारी श्री अजय कटाईत , अध्यासी अधिकारी श्री आर आर बऱ्हाणपू रे ,. तलाठी विद्या केदार इत्यादी कर्मचारी उपस्थीत होते . यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली तर भव्य फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करून सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी गावकरी तंटा मुक्त अध्यक्ष श्री छगन आडकीने , मधुकर भालमे . निलेश डोळस , विठल तुरानाकर . पपू अहिरकर , आदी ग्राम वासी मोठ्या संख्येने हजर होते .
Add Comment