पोलीस रिपोर्टर महाराष्ट्र

दुर्गापूरात ATM फोडण्याचा प्रयत्न करणारा बालक ताब्यात…

चंद्रपूर  -दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत बॅंक आॅफ इंडीया चे ATM, व ATM मधील CCTV कॅमेरा फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन बालकास पोलीस स्टेशन दुर्गापूर ह्यांनी ताब्यात घेतले. पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे रिपोर्ट दिल्यावरून अप. क्र.16/21 अन्वये कलम 379, 511 भादवी चा गुन्हा दि. 15/01/21 रोजी दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वृत्त असे की, दि. 14/01/21 चे रात्री 03:00 वा. चे सुमारास बँक ऑफ़ इंडिया ATM शक्तीनगर, येथुन ATM मशीन व CCTV कॅमेरा ची तोडफोड करून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदर गुन्ह्यात दुर्गापूर पोलीसांनी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले, वि. स. बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या कडुन गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोनोने पोहवा सुनिल गौरकार 785 नापोशि उमेश वाघमारे 2070 पोशि मनोहर जाधव 931 पोशि संतोष आडे 2794 पोशि सुरज लाटकर 2817 यांनी केली.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!