तालुक्यातील भाजप विचारसरणी चे सर्वात जास्त उमेदवार आले अविरोध
चिमूर सुरज नरुले तालुका प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला असून ८८ ग्राम पंचायत निवडणुका होत असून अनेक ठिकाणी पक्ष किंवा मित्र मंडळीतील कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढत देत असून भाजपचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पॅनल चे सर्वात जास्त उमेदवार अविरोध निवडून आले आहेत
चिमूर तालुक्यातील शंकरपुर ग्राम पंचायत ची निवडणूक प्रतिष्ठेची होत असून कांग्रेसचे सतीश वारजूकर यांचे चिरंजीव लढत देत असून त्यांच्या पॅनलच्या विरोधात मजबूत खंबीर उमेदवार ठेवून येथील मनोहर रंदये नारायण चौधरी यांनी पॅनल टक्कर देत असून कडक्याचा मुकाबला होत आहे
तालुक्यातील अनेक गावांत दोन पॅनल निवडणुका लढत देत असून पॅनल मधून उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी पॅनल विरोधात बंडाचा पवित्रा घेत अपक्ष निवडणूक लढत आहे
तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक प्रतिष्ठेची करीत जीप सदस्य सतीश वारजुरकर व जीप सदस्य गजानन बुटके हे सुद्धा आपापल्या पॅनल मधून निवडणूक लढत आहे
नवेगाव पेठ येथील सुद्धा निवडणूक रंगात येत असून भाजप नेत्यांचे नातेवाईक आपले नशीब आजमावत आहे त्यात भाजपचे जिल्हा सचिव राजू देवतळे यांचा पुतण्या राकेश देवतळे , बूथ अध्यक्ष तुषार खलोरे यांची आई आणि स्वतः विवेक कापसे सुद्धा निवडूकीला सामोरे जात आहे तर गावात आला रे आला बाला ही धून खूप चर्चेत आहे
नेरीत सुद्धा भाजपचे डॉ श्यामजी हटवादे व त्यांचे सहकारी नेते यांची पॅनल ही कांग्रेसचे संजय डोंगरे पॅनल ला टक्कर देत आहे
तालुक्यातील सर्वेक्षण बघता आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या विचारांच्या पॅनल सर्वात जास्त ठिकाणी वर्चस्व ठेवण्यात यश असल्याचे चित्र दिसत असून सर्वात जास्त अविरोध उमेदवार निवडून आले आहे खडसंगी जिल्हा परिषद क्षेत्रात विनोद चोखरे सुद्धा ग्राम पंचायती वर झेंडा रोवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे
बघू या येणाऱ्या दिवसात कोण कोणाचे बाजीगर ठरतील एवढेच..
Add Comment