महाराष्ट्र सामाजीक

लॉयड मेटल्स कंपनीच्या विस्तारीकरणाच्या जनसुनावणीत नागरिकांचा आक्रोश….

घुग्गुस – लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लिमि. या कंपनीच्या ७६० कोटींच्या प्रकल्प विस्तारीकरणासाठी आज कंपनी परिसरात सकाळी 10.30 वाजता जनसुनावणी पार पडली.
यावेळी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.घुग्गुस शहरातील लोकवसाहती नजीक लॉयडस मेटल्स अन्ड एनर्जीच्या कच्च्या लोखंडाचा कारखाना आहे. या कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत ओरड कायम असताना व्यवस्थापनाने कारखान्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.लॉयडस मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचे स्पंज आर्यनचा ४०० क्षमतेचा असलेला एक तर १०० क्षमतेचे चार युनिट सुरू आहे. त्यापासून 3 लाख २४ हजार टीपीए इतकी उत्पादन क्षमता आहे.तसेच २५ एम.एस. कारखान्यातून वीज निर्मिती होत आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. मात्र प्रदूषण कमी झाले नसताना विस्तारीकरण होऊ घातले असल्याने आज जनसुनावणीत घुग्घुस, नकोडा, महातारदेवी,उसगाव येथील नागरिकांनी प्रदूषण,शेती प्रदूषण, बेरोजगारी, आरोग्याला हानीकारक प्रश्नावरून 80% नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत लॉयडस प्रशासनाला वेठीस धरले.

तर कंपनीतील अनेक वर्षांपासून कंत्राटदार असलेल्या राजकीय नेत्यांनी समर्थन केल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांची खिल्ली उडविली
याप्रसंगी सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!