चंद्रपूर जिल्हा घडामोडी

महाराष्ट्र राज्य महामार्गाचा ” तो ” रस्ता त्वरित पूर्ण करा…. महानगर भाजपाचे धरणे आंदोलन….

चंद्रपूर:-हॉटेल सिद्धार्थ ते एम इ एल पर्यंत ४किमी अंतर असणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असला तरी,या रस्त्याच्या देखभालीची जवाबदारी राज्य शासनाच्या राज्य महामार्ग यांच्या अखत्यारीत आहे.गेले कित्येक महिन्यांपासून हा मार्ग अपघाताला आमंत्रणच देत नाही तर अनेकांचे बळी गेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य महामार्गाचा हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा,अशी मागणी भारतीय जनता पार्टी,महानगर चंद्रपूरच्यावतीने,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी धरणे आंदोलन चे नेतृत्व करतांना केली.
ते भाजपा महानगर चंद्रपूरच्यावतीने महाविदर्भ समोरील रस्त्यावर धरणे आंदोलन दरम्यान गुरुवार(१७ नोव्हेबर)ला आंदोलनकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. यावेळी भाजपा महानगर महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार,ब्रजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजप नेते ऍड सुरेश तालेवार,रामपालसिंग,प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासंगोट्टूवार,नगरसेवक राहुल घोटेकर,रवी आसवानी,संदिप आवारी,शीतल गुरनुले,सोपान वायकर,प्रदीप किरमे,ज्योती गेडाम,शिला चव्हाण,भाजयुमो नेते प्रज्वलंत कडू,सुनील डोंगरे,प्रमोद क्षीरसागर,सुरज पेदूलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महानगर भाजपाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले.
डॉ गुलवाडे म्हणाले,गडचिरोली जिल्ह्यातील मुरूमगाव ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी पर्यंत २५० कि मी चा हा राष्ट्रीय महामार्ग आहे.यातील ४किमी चंद्रपुर महानगरात आहे.राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे याची जवाबदारी आहे.अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळेच रस्त्याची दयनीय अवस्था झाली.पण,चंद्रपूरची जनता आता सहन करणार नाही.पुढील काही दिवसात हा मार्ग सुव्यवस्थित झाला नाही तर,आंदोलन तीव्र करू असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
यावेळी महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र फुलझेले,अंजली घोटेकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अरुण तिखे,सपना नामपल्लीवार, चंद्रकला सोयाम, माया उईके,वंदना जांभूळकर,पूनम गरडवा, रेणूका घोडेस्वार, प्रभा गुळधे,ज्योती गेडाम, वंदना संतोषवार, मोनिशा महातव,प्रतिभा कामतवार, कविता सरकार, उषा मेश्राम, चंदन पाल, धनराज कोवे, अंकुश सवसाकडे, वनिता डुकरे, सुरज सरदम, शशिकांत मस्के, बलाई चक्रवर्ती, मनोरंजन रॉय, रवी लोणकर, महेंद्र जुमडे, रामकुमार आकापेल्लीवार, राम हरने, राकेश बोमनवार, दशरथ सोनकुसरे, रामणारायन रविदास, अरविंद कोलटकर, मधू श्रीवास्तव, रामीता यादव, सुनीता चव्हाण, निशा समाजपती, सोनी सिंग, अशी मंडल, गीता मेंढे, राहुल पाल, कुणाल गुंडावार, श्रीकांत येलपुलवार,स्नेहीत लांजेवार, योगेश कुचनवार, प्रणय डंबारे, नितीन गुप्ता, श्रीकांत एलपुलवार, रोशन माणुसमारे, आशिष ताजने, अभि वांढरे, मनोज पोतराज, धनंजय मुकलवार, संजय पटले, सत्यम गाणार, मनोज दूरटकर, अमोल नागराळे, आकाश ठुसे यांनी घोषणाबाजी करीत,आंदोलनात सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे संचालन विशाल निंबाळकर यांनी केले तर राहुल घोटेकर यांनी आभार मानले.यावेळी रस्त्यावरील गढ्यात वृक्षारोपणही करण्यात आले.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!