महाराष्ट्र सामाजीक

काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व…

आवळगाव
आवळगाव ,हळदा, चिचगाव ,डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या लढतीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलच्या १३ पैकी १२ उमेदवार विजय झाले आणि सेवा सहकारी सोसायटी वर परत आपले वर्चस्व कायम ठेवले.
विरोधी गटाला फक्त एका महिला उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले.
शेतकरी पॅनल चा हा विजय म्हणजे त्यांनी मागील पंचवार्षिक काळात केलेल्या सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या कामाची आणि सेवा सहकारी सोसायटीला नेऊन ठेवलेल्या विकासाच्या उंबरठ्याची पावती होय असे आवळगाव येथील जनतेच्या बोलक्या भावना होत्या.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते.
अनुसूचित जाती/ जमाती
१) योगराज हिरामण चौधरी
४४१
विमुक्त/ भटक्या/ विशेष मागास
२) यादव नथू पराते-४०२
इतर मागास प्रवर्ग
३) प्रशांत पंढरी झरकर-४०८
महिला राखीव
४) मंजुळाबाई गणपत गिरडकर
३८७
५) ललिता देवराव ठाकरे-३७१
सर्वसाधारण गट
१) विठ्ठल चिंतुजी किनेकर
३८८
२) केवळ सखाराम बाणबले
३८४
३) दिवाकर बापूजी किरमीरे
३५४
४) रामदास बाजीराव भोयर
३५४
५) हरीदास बिसण नखाते
३४३
६) किशोर देवराव राऊत
३२८
७) केवळराम मुखरुजी मुसकर
३२६
८) श्रावण काशीराम आंबोरकर
३१०
सर्व विजयी उमेदवारावर गावकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
महिला गटातील ललिता देवराव ठाकरे ह्या एकमेव विरोधी गटातील उमेदवार विजय झाल्या.

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

error: Sorry !! Content is Copyright protected !!