शेगांव बू —- प्रतिनिधी , मनोज गाठले .
स्थानिक वरोरा तालुक्यातील चार गाव खुर्द ग्रामपंचायत येथील तसेच परिसरातील अनेक गावातील ग्राम पंचायत सरपंच पदाची निवडणूक शानंततेत पार पडली असून यात मागील वर्षी सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत असलेले युवा सरपंच श्री राजू चिकटे यांनी गावात केलेल्या ग्राम विकास , सुख सोई , अनेक शासकीय योजना या गावात भरपूर प्रमाणात हिसकावून गावकऱ्यांना दिलेला शब्द येथील श्री राजू चिकटे यांनी पूर्ण केले हेच विकास कामे लक्ष्यात घेऊन या वर्षी देखील गावकऱ्यांनी दुसऱ्यांना पुन्हा सरपंच पदाची खुर्ची बहाल केली. तर यावेळी. उप सरपंच पदी सौ सुवर्णा ताई शेंडे यांची निवड करण्यात आली . तर सदस्य पदी . श्री संजय चवले , वनिता कष्टी , इंदिरा पावडे , शुल्का दाडमल , सखुबाई शेंडे , दुर्गेश पावडे , सिद्धार्थ गायकवाड , यांची अविरोध निवड करण्यात आली ..
तसेच परिसरातील दादापुर येथे सरपंच श्री. विजय खाडे , व उप सरपंच पदी श्री नथुजी वढई ,
सोनेगाव( लोधी ) ग्रामपंचायत च्य सरपंच पदी सौ तेजस्विनी अनंता बुरहान , उप सरपंच पदी श्री नरेश पुंडलिक हरणे , व. सदस्य पदी लोपाबाई खिरातकर , छाया शंकर गेडाम यांनी निवड करण्यात आली . यावेळी अविनाश खिराटकर , गजानन साखरकर , दादाजी बुरहण , शरद खारकर , विनोद गेडाम , निलेश लील्हारे , विनोद दमाये , इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले .
तसेच ग्रामपंचायत चार गाव (बू) येथे सरपंच पदी श्री योगेश्वर वयदुळे , तर उप सरपंच पदी संगीता मगाम ,. यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी श्री रामदास डा हू ले , अजय ताराचंद बागडे , सौ शालू ताई भलमे , मंगला घाणोडे , यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे शेगाव ग्रामीण परिसरात अनेक ग्रामपंचायत मध्ये. येथील. नाव निर्वाचित. खासदार मा श्री. बाळू भाऊ धानोरकर , तसेच आमदार मा सौ प्रतिभा ताई. धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री. राजू भाऊ चिकटे यांनी अनेक गावात ग्रामपंचायत कार्यालयावर. कांग्रेस पक्ष्याचा झेंडा फडकला ..
यावेळी प्रत्येक गावातील कांग्रस पक्ष्याचा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करून एक मेकांना सदिच्या भेट दिल्या ..
Add Comment