Breaking News चंद्रपूर जिल्हा घडामोडी महाराष्ट्र राजकीय घडामोडी

रेतीघाटांचे चिरहरण रोखण्यात “कोरोना” सुद्धा अपयशी!

महेश पानसे
विदर्भ अध्यक्ष, राज्य पत्रकार संघ
चंदपूर जिहयात अवैद्ध रेती उत्खनन् व वाहतुक हा विषय पानचट झाला असला तरी दिवसेंदिवस गंभीर व चिंतनिय होत चालला आहे.कारण ज्या झपाटयाने जिल्यातील ही खनिज संपत्ती लोप पावत आहे ती बघता भविष्यात ही लुटमार करणारी गुंडमंडळी फक्त अन फक्त देशद़ोही म्हणूनच शिक्षेस पात्र ठरावी असेच कायदे तयार करण्याची वेळ येईल असेच चित्र तयार होत असल्याचे स्पष्ट होते.शाशकिय यंत्रणेला भविष्यात जन आक़ोशाचा सामना करताना नैतिकता तपासावी लागेल व या भयंकर अपराधाचे कलंक माथी घेऊन बसावे लागते की काय ही भिती प़ामाणिक महसूल अधिकाऱ्यांची असल्यास नवल नसावे.गत अनेक वषांपासून सुरू असलेली रेतीतस्करी निंदनीय व यात गुंडाना साथ देणारे प़शाशनातील अधिकाऱ्यांची वतंणूक अतिनिंदणीय
आहे हे वेगळे सांगायची गरज आता
उरलेली नाही.
उत्कृष्ट रेती साठी प्रसिद्ध असलेल्या मूल,सावली,गोंडपिपरी,सिंदेवाही,गोंडपिपरी तालुक्यातील अनेक घाटांचा लिलाव “रेती संपली” या सबबीखाली न करता येण्याची नामुकी प़शाशनावर आली आहे.प़त्यक्षात या घाटांमधून रेतीचोरांनी एकत्रपणे या घाटांचे एवढे चिरहरण केले की आता पयांवरणाच्या आडकाठीला सामोरे जायला प़शासनास दम लागत आहे. कधीकाळी बेजोड अमुल्य रेती असलेल्या या संपन्न घाटातील संपत्तीवर अनैसगिंक बलात्कार करणाऱ्या गुंडाना(तस्कर) अनेक महसूल अधिकाऱ्यांनी साथ दिली होती हे सवंश्रुत झाले आहेच.रेती तस्करांमध्ये अनेक पक्षांचे कायैकतै आहेत व काही दिगगज नेते त्यांची पाठराखण करण्याचा आपला भिकारचोट धंदा सुरुच ठेवून आहेत हे नव्याने सांगायची काय गरज आहे?२ महिनेआधी रेती घाटांच्या लिलावाचा मुहूर्त सापडला व जिल्हयातील अनेक तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला.यातून शासनाच्या तिजोरीत बर्‍यापैकी महसूल सुद्धा या माध्यमातून जमा झाला .मात्र लिलाव न झालेल्या घाटांना ओरबाडणे व लिलाव झालेल्या घाटांवर बेकायदेशिर ,अनैसगिंक बलात्कार करणे पुन्हा जोमाने सुरू झालेले बघता अमुल्य खनिज संपत्तीची लुटमार दिघंकाळ चालणार का? हा प़श्न कायम आहे.

गोंडपिपरी तालुक्यात हिवरा, कुलथा, येनबोधला. विठ्ठल वाडा, नांदगाव ,लिखित वाडा (टेकोडा )तारसा ,राळापेठ असे अनेक रेतीघाट आहे परंतु येथील रेतीघाट पर्यावरणाच्या काही अटीमुळे लिलाव होऊ शकले नाहीत. कारण या घाटांमधून एवढा बेकायदेशीर उपसा करण्यात आला आहे की कधीकाळी रेतीसाठी श्रीमंती असलेले हे घाट ओसाड झाले आहेत. ईथे गुंडाची लुटमार सुरू असताना महसूल अधिकारी झोपेचे सोंग घेऊन होते काय?अशी आओरड राहिली आहे.

ईतरही तालुक्यांमध्ये जवळपास अशीच स्थिती आहे.या घाटाशेजारी रेतीचोरांनी उपसा करून ढिगारे उभे केले. काही महसूल अधिकारी ऐवढे चतूर की यांनी चकक या ढिगाऱ्याशेजारी पत्रकारांना सोबत घेऊन फोटोसेशन करून आपणच चोरी पकडल्याचा केलेला कांगावा जनतेपासून लपून तरी कुठे राहीला आहे? गोंडपिपरी मध्ये अशी चचां जरा जास्तच राहिली आहे.मूल,बल्लारशा या तालुक्यात रेती चोरांवर महसूल अधिकाऱ्यांचा वचक ठेवण्यात प़शाशनाला यश आले आहे. याला कारण तिथल्या तहसिलदारांनी दलालांसोबत न ठेवलेले फाजील संबध हेच म्हणता येईल.चंद़पूर जिल्हया कोरोना विषाणू संसगं परिस्थितीने हादरला आहे,बांधकामे ओस पडली आहेत,मात्र यंदा लिलाव झालेल्या घाटांवरून दिवसरात्र उपसा होऊन रेती चालली कुठे? कुणाच्या वरदहस्ताने?जिल्हयात अवैद्द् रेती व्यवहाराची मोठी रेलचेल आहे.अवैद्द् दारू विक़ी हा या मानाने चिल्लर धंदा ठरतो. व हे दोन्ही धंदे जिल्यहयातील दोन हुकमी
नेते आपल्या पदराआड चालवितात असेही बोलले जाते. या दोन्ही चोर धंद्यातून आपल्या चमच्यांचे कुटूंब चालविणे हा नेत्यांचा उद्धेश वरकरणी चांगुलपणाचा वाटत असला तरी मात्र
यामूळे फार मोठी राष्टीय,सामाजीक, आथिंक व प़शाशकीय हानी सुरू आहे,महसूल यंत्रणा काळवंडत आहे
हे सत्य नकारता येत नाही.नेते,अधिकारी,व तस्कर यांनी आपली नैतीकता न ओळखता राष्टीय संपत्तीचा विनयभंग सुरूच ठेवला तर भविष्यात चंदपूर जिहयातील शुंगारलेल्या नदी-नाल्यांची श्रीमंती नावालाच उरणार आहे हे निश्चिंत.
चंद़पूर जिल्हयात रेतीतस्करी व दारूतस्करी बेभान होण्याची तिन मुख्य कारणे समजली जातात.एकतर काही पावरफुल नेत्यांनी या बेकायदेशीर धंदयांचे पळदयामागून स्विकारलेले स्वामित्व.दुसरे प़शाशनाचे अपारदर्शक नियम व तिसरे प़शाशनातील अधिकाऱ्यांची अथंपुणं वागणूक(काही अपवाद आहेत).

अवैद्द् ,बेसुमार रेती उपसामुळे शाशनाचा मोठा महसूल बुडाला याहीपेक्षा मोठी नैसगिंक व पयांयाने राष्टीय हानी झाली व सुरूच आहे.शेवटी याला देशद़ोह नाही तर काय म्हणता येईल?
ज्या ज्या रेती घाटावर मोठे मोठे रेतीचे ढिगारे. उभे केलेले आहे त्याच रिती माफियांशी आर्थिक देवाण-घेवाण आतून. त्याचं रेती माफिया ला रीतीचा ठेका देण्यात येत होता असे एक नव्हे तर सर्वच रेती घाटावर प्रकार पहावयास मिळालेला आहे यात करोडो रुपयांचा महसूल शासनाचा बुडवून तहसीलदार व रेती माफियांच्या खिशात जमा झालेला आहे यात इतर विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली असता सर्व नदी घाट खोदून लाखो ब्रास रेती गायब असल्याचे चित्र पहावयास मिळेल अधिक तपास केला असता सर्व रेती घाटांच्या अवैधरेती ला वैध ठरवून ज्या रेती माफियांना रीतीचा ठेका देण्यात आला ती प्रक्रिया सुद्धा पूर्ण चुकीचे असल्याचे निष्पन्न होईल. एखादे लाख रुपयाचे प्रकरण असले तरी .प्रशासन त्याला गांभीर्याने घेत असते. पोलीस कारवाई पासून तर सर्वच ससेमिरा त्याच्या मागे लावले जाते तर मग एका अधिकाऱ्याकडून येथे इतका मोठा गैरप्रकार होत असेल तर मग येणारा काळ सुद्धा गोंडपिपरी तालुक्यासाठी घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा सर्व प्रकरणांचा तपास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करावा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त कधी तीव्र आंदोलन करावे लागेल असा मानस येथील जनसामान्यांनी व्यक्त केला आहे.
v


About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!