चिमूर तालुका प्रतिनिधी सुरज नरुले
चिमूर उपप्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय चिमूर यांचे अधिनस्थ येत असलेल्या अडेगाव देश टेकेपार मोटेगाव खांबाडा आंबेनेरी बोडद्धा मासळ या धान खरेदी केंद्राची किरण चव्हाण यांचे अधिकारात असून किरण चव्हाण हे धान खरेदी करताना आदिवासी सोसायटीचे काही सचिव शी संगनमत करून ज्यांच्या कडे शेतीचे धान पिकले नाही अश्या शेतकऱ्यांचे सातबारे जोडून शासनाशी फसवणूक करीत आहे असे समजते काही शेतकऱ्यांशी सवांद साधला असता काही शेतकऱ्यांनी ४० किलो धानाचा पोता ६०० ग्राम पोता खाली वजन असा ४० किलो ६०० ग्रॅम व्हायला पाहिजे मात्र तसे न करता प्रत्येक क्विंटल मागे २ ते ३ धानाची कमी दाखवून लूट केली जात आहे या पूर्वी काही राईस मिल यांनी तक्रार केल्याचे समजते किरण चव्हाण हा अश्या प्रकारे लाखो रुपयांची धान्य खरेदी करून यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करीत आहे
या सर्व प्रकारास पायबंद घालण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी चिमूर सोनवाणे मॅडम ह्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे व त्या चिमूर येथे राहत नसून चंद्रपूर येथे राहत असतात
किरण चव्हाण यांना नाशिक येथे झालेल्या बोगस प्रकिया घोटाळ्यात निलंबित करण्यात आले होते किरण चव्हाण हे चंद्रपूर येथे राहत असून यांचे कडे आर्थिक व्यवहार कसे काय दिले अश्या प्रकारे धान खरेदी चालू असल्याने याबाबत ची माहिती प्रत्यक्ष प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय चंद्रपूर येथे जाऊन देण्यात आलेली आहे
तसेच ११ जानेवारी २१ ला सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव उपकेंद्राला मान्यता नसताना धान्य खरेदी करण्याबाबत ची तक्रार करण्यात आली आहे याबाबत श्री कोटलावार यांचेशी संपर्क साधला असता कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु अजून पर्यत कारवाई झाली नाही
विपणन निरीक्षक राठोड व किरण चव्हाण तसेच सोनवाणे मॅडम यांना अभय दिसून येत असल्याचे दिसून येते याबाबत नाशिक व नागपूर या कार्यालयस तक्रार देण्यात येणार असल्याचे माजी जीप सदस्य विलास डांगे यांनी करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे
Add Comment