चंद्रपूर जिल्हा घडामोडी

चिमूर तालुका उपप्रादेशिक कार्यालयाचा धान्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार …

माजी जीप सदस्य विलास डांगे यांचा आरोप व चौकशी ची मागणी

नेरी प्रतिनिधी।

उपप्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय चिमूर यांचे अधिनस्थ येत असलेल्या अडेगाव देश, टेकेपार, मोटेगाव, खांबाडा ,आंबेनेरी, बोळधा, मासळ या धान खरेदी केंद्राची किरण चव्हाण यांचे अधिकारात असून किरण चव्हाण हे धान खरेदी करताना आदिवासी सोसायटीचे काही सचिव शी संगनमत करून ज्यांच्या कडे शेतीचे धान पिकले नाही अश्या शेतकऱ्यांचे सातबारे जोडून शासनाशी फसवणूक करीत आहे असे आरोप विलास डांगे माजी जी प सदस्य यांनी केला आहे
परिसरातील काही शेतकऱ्यांशी सवांद साधला असता काही शेतकऱ्यांनी ४० किलो धानाचा पोता ६०० ग्राम पोता खाली वजन असा ४० किलो ६०० ग्रॅम व्हायला पाहिजे मात्र तसे न करता प्रत्येक क्विंटल मागे २ ते ३ किलो धानाची कमी दाखवून लूट केली जात आहे तसेच प्रत्येक खरेदी केंद्रावर शासनाने खरेदी साठी इलेक्ट्रॉनिक किलो काटे पाठविले आहे परंतु त्यांचा वापर करण्यात आला नाही वजन काट्यांचा वापर करून शेतकऱ्यांना लुटण्यात आले धान्य मापताना हमाली 20 रुपये घेण्यात आली परंतु शासन हमाली देत असताना यांनी ती घेऊन भ्रष्टाचार केला या पूर्वी काही राईस मिल यांनी तक्रार केल्याचे समजते किरण चव्हाण यांनीअश्या प्रकारे लाखो रुपयांची धान्य खरेदी करून यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे असा आरोप डांगे यांनी केला आहे
या सर्व प्रकारास पायबंद घालण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी चिमूर सोनवाणे मॅडम ह्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे व त्या चिमूर येथे राहत नसून चंद्रपूर येथे राहत असतात
किरण चव्हाण यांना नाशिक येथे झालेल्या बोगस प्रकिया घोटाळ्यात निलंबित करण्यात आले होते किरण चव्हाण हे चंद्रपूर येथे राहत असून यांचे कडे आर्थिक व्यवहार कसे काय दिले अश्या प्रकारे धान खरेदी चालू असल्याने याबाबत ची माहिती प्रत्यक्ष प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय चंद्रपूर येथे जाऊन देण्यात आलेली आहे
या सर्व प्रकाराला विपणन निरीक्षक राठोड व किरण चव्हाण तसेच सोनवाणे मॅडम यांना अभय देताना दिसून येत असल्याचे दिसत आहे याबाबत नाशिक व नागपूर या कार्यालयस तक्रार देण्यात येणार असल्याचे माजी जीप सदस्य विलास डांगे यांनी सांगितलेअसून कारवाई करण्याची मागणी केली आहे

About the author

लोकवाचक न्यूज

श्री. कवेश तुकाराम कष्टी
Phone: +919860703939
Whatsapp no. : +917758031995
Email: lokwachaknews@gmail.com
UDYAM REG. NO. - UDYAM-MH-08-0001959

Add Comment

Click here to post a comment

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
error: Sorry !! Content is Copyright protected !!